विशेष मोक्का न्यायालयाने केली दोघांच्या पोलिस कोठडीत वाढ

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

विशेष मोक्का न्यायालयाने केली दोघांच्या पोलिस कोठडीत वाढ

अहमदनगर/प्रतिनिधी -तोफखाना पोलीस ठाण्याच्या आवारात धारदार शस्त्राने मारहाण करून खुनाचा प्रयत्न करणार्‍या आकाश डाके व गणेश कुर्‍हाडे यांना विशेष मोक्क

कोपरगाव तालुक्याची शांतता भंग होउ देउ नका
डॉ. सुभजीत मुखर्जी यांना शिक्षणमहर्षी लहानुभाऊ नागरे स्मृती पुरस्कार
लोककलावंत शांताबाई लोंढे यांचा 5 लाख देऊन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सन्मान

अहमदनगर/प्रतिनिधी -तोफखाना पोलीस ठाण्याच्या आवारात धारदार शस्त्राने मारहाण करून खुनाचा प्रयत्न करणार्‍या आकाश डाके व गणेश कुर्‍हाडे यांना विशेष मोक्का न्यायालयाने वाढीव पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले. शहरातील बोल्हेगाव परिसरातील गांधीनगर भागामध्ये महिलांच्या दोन गटांमध्ये किरकोळ स्वरूपाचा वाद झाला. त्याची फिर्याद दाखल करण्यासाठी तोफखाना पोलिस ठाण्यात आल्यानंतर पोलिस ठाण्याच्या आवारातच दोन गट एकमेकांसमोर भिडले. त्यापैकी एका गटाने चाकूने व कोयत्याने दोघांवर हल्ला चढवला. याप्रकरणी पोलिसांनी फिर्यादी सचिन निकम यांच्या फिर्यादीवरून गणेश कुर्‍हाडे, अक्षय डाके, किरण सोमनाथ, सागर डाके, गौरव जगधने, बाळासाहेब वाघमारे, प्रथमेश चौरे यांच्याविरुद्ध खुनाचा प्रयत्न करण्याचा गुन्हा दाखल केला होता. या गुन्ह्याची गांभीर्याने दखल घेऊन गुन्ह्यात मोक्काअंतर्गत कारवाई करण्याचा प्रस्ताव विशेष पोलिस महानिरीक्षक नाशिक यांना सादर केला होता. या प्रस्तावास त्यांनी मंजुरी दिली. या पार्श्‍वभूमीवर तपासी अधिकारी पोलिस उपअधीक्षक संदीप मिटके यांनी आरोपींना विशेष मोक्का न्यायालय येथे हजर केले असता विशेष मोक्का न्यायालयाने आठ दिवसांची वाढीव पोलीस कोठडी सुनावली. सरकारी पक्षातर्फे अ‍ॅड. अनिल ढगे व पोलिस उपअधीक्षक मिटके यांनी युक्तिवाद केला. न्यायालयाने तो ग्राह्य धरून आरोपींना आठ दिवसाची वाढीव पोलीस कोठडी दिली. आकाश डाके व गणेश कुर्‍हाडे या दोघांविरुद्ध कोतवाली, तोफखाना व एमआयडीसी पोलिस ठाण्यात प्रत्येकी बारा-बारा गंभीर गुन्ह्यांची नोंद आहे.

COMMENTS