विना मास्क फिरणाऱ्यांना पोलिस तुरुंगात धाडणार का ? नवापूरला विना मास्क फिरणाऱ्यास, न्यायालयाने ठोठावली ५ दिवसांच्या तुरुंगवासाची शिक्षा

Homeमहाराष्ट्रअहमदनगर

विना मास्क फिरणाऱ्यांना पोलिस तुरुंगात धाडणार का ? नवापूरला विना मास्क फिरणाऱ्यास, न्यायालयाने ठोठावली ५ दिवसांच्या तुरुंगवासाची शिक्षा

मास्क न लावता फिरतांना आढळून आल्याने नंदुरबार जिल्ह्यातील नवापूर येथे जहांगीर उस्मान मिर्झा यास नवापूर प्रथमवर्ग वर्ग न्यायालयाने पाच दिवसांची साध्या कैदेची शिक्षा सुनावली.

कोळकेवाडी दूर्ग : किल्ल्यावर चढाई करताना एक वेगळाच अनुभव
नेवासा तालुक्यातील विकासाचा अनुशेष भरून काढणार : ना. शंकरराव गडाख
Balasaheb Thorat : भारतीय जनता पार्टीचा जनाधार म्हणजे केवळ नौटंकी

श्रीरामपूर :  मास्क न लावता फिरतांना आढळून आल्याने नंदुरबार जिल्ह्यातील नवापूर येथे जहांगीर उस्मान मिर्झा यास नवापूर प्रथमवर्ग वर्ग न्यायालयाने पाच दिवसांची साध्या कैदेची शिक्षा सुनावली. 

नवापूरातील लाईट बाजार भागात १ एप्रिल रोजी सकाळी ११ वाजता जहांगीर उस्मान मिर्झा हा व्यक्ती मास्क न लावता फिरत होता,त्याला पोलिसांनी हटकले असता त्याने कोरोना हवेतून पसरत नाही म्हणून मास्क किंवा रुमाल तोंडाला बांधणार नाही असे सांगितले. त्यामुळे सार्वजनिक ठिकाणी कोरोना विषाणूचा संसर्ग होईल अशा पद्धतीने वागल्यामुळे त्याच्याविरुद्ध नवापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता,सदरील प्रकरणी त्यास न्यायालयात हजर केले असता नवापूर प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी आर. बी. बहिरवाल यांनी जहांगीर मिर्झाला ५ दिवसांच्या साध्या कारावास

तथा हजार रुपये दंड अशी शिक्षा सुनावली, सोबतच दंड न भरल्यास पुन्हा २ दिवस साध्या कैदेची शिक्षा सुनावली, दोषारोपपत्र सहायक पोलिस निरीक्षक धिरज महाजन यांनी सादर केले,पैरवी अधिकारी म्हणून हवालदार प्रमोद पाठक होते, निकाल देतांना न्यायालयाने म्हटले की, कोरोनाचा संसर्ग

मोठ्या प्रमाणावर होत असल्याने गंभीर परिस्थिती उद्भवली आहे. संसर्ग सार्वजनिक ठिकाणी टाळता यावा म्हणून नागरिकांनी तोंडावर मास्क किंवा रुमाल बांधण्यायाबत संबंधीत यंत्रणांनी सूचना जाहीर करूनही नागरिकांनी बेजवाबदारपणाचे वर्तन टाळावे. सबळ कारणाशिवाय आरोपीने सदर स्वरूपाचे केलेले वर्तन हे कोरोना विषाणू संसर्ग कालावधीत गंभीर स्वरूपाचे असल्याने जास्तीत जास्त शिक्षेद्वारे दंड ठोठावणे हे कायदा व सुव्यवस्थेचे पालन व्हावे म्हणून आवश्यक ठरत असल्याचे म्हटले आहे, नंदुरबार जिल्ह्यात मास्क न लावणाऱ्यावर गुन्हा दाखल करून त्याला शिक्षा ठोठावण्याची ही पहिलीच वेळ असल्याने संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली आहे, जर असे कृत्य करणाऱ्या व्यक्तीला साधे पोलीस धरून न्यायालयात सबळ पुरावे सादर करून ५ दिवस का होत नाही त्यास तुरुंगाची हवा खाऊ घालतात हे नवापुरला होऊ शकतो तर अहमदनगर जिल्ह्यात का होऊ शकत नाही ?, गरज आहे इच्छा शक्तीची परंतु करणार कोण ?’ जिल्ह्याचे जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक हे जरी रस्त्यावर उतरून आहोरात परीश्रम घेत असले तरी,नुसते जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षक यांनी रस्त्यावर उतरून उपयोग होणार नाही तर कनिष्ठ अधिकाऱ्यांनी सुद्धा त्यांना पक्की साथ दिली पाहिजे,परंतु कनिष्ठ अधिकाऱ्यांकडून असे पावले उचलले जात नसल्याचे दिसून येते आहे, सर्वांच्याच जीवना-मरणाचा प्रश्न असल्याने हे काम सर्वांनी मिळून केले तर कुठतरी ही साखळी तुटेल ,इथं प्रश्न जहांगीर उस्मान मिर्झा या एकट्याचा नसून कोणी अमोल, जसविंदर, मायकल, माणिकचंद अशाप्रकारे बिगर मास्क बिनकामाचे फिरणारे सर्वच लोकांचा आहे, या लोकांवर देखील अशीच योग्य कारवाई झाली तर कोणी बाहेर फिरण्याचे धाडस करणार नाही,यासाठी नवापूरसारख्या कारवाईचा बडगा अहमदनगर जिल्ह्यसह संपूर्ण राज्यात उगारला जावा हीच काळाची गरज आहे, अन्यथा मनुष्यमात्र प्राणी धरतीवर उरणार नाही असा गंभीर प्रश्न पुढे उभा ठाकला असताना काही अज्ञानी लोकांना समजणार तरी कधी असा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे.

 कठोर लॉकडाऊन, कारवाईशिवाय पर्याय नाही : – शौकतभाई शेख

 यासाठी कठोर लॉकडाऊन तथा कठोर कारवाईच योग्य ठरणार आहे त्याशिवाय दुसरा पर्याय नाही, रुग्णांची संख्या रोजच झपाट्याने वाढत आहे,केवळ शासनच करील यावर आवलंबून न राहता स्वत:हुन कृती केल्याशिवाय या महाभयंकर संकटास पिटाळणे कदापी शक्य नाही करीता सर्वांनीच वेळेतच या संकटास समजून घेत विविध उपाययोजना अंमलात आणने गरजेचे ठरत आहे.यासाठी शासन,प्रशासन आपल्यापरीने आवश्यक त्या उपाययोजना करत आहेत, आता जबाबदारी ती आपली आहे, घाबरुन जाऊ नका, या संकटसमयी घरातच रहा, सुरक्षित रहा, स्वत:ला संभाळा आणि आपल्या परीवारासही सांभाळा,कारण आरोग्य,पोलिस,महसूल आदी यंत्रणा ही आपल्या हितासाठीच राबत आहे,त्यांना समजून घेत त्यांना सहकार्य करा.

COMMENTS