विदर्भात होणार चित्रपटनगरी..? संजय दत्त नितीन गडकरींच्या भेटीला…

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

विदर्भात होणार चित्रपटनगरी..? संजय दत्त नितीन गडकरींच्या भेटीला…

प्रतिनिधी : नागपूर विदर्भात चित्रपटनगरी स्थापन करण्याच्या प्रयत्नांना वेग आल्याचे दिसते. अभिनेता संजय दत्त याने नुकतीच केंद्रीय महामार्ग विकास

युध्द आणि प्रेमासारखं राजकारणातही सारे काही क्षम्य ?
राजरत्न आंबेडकरांनी वैचारिक वारसा जपला ः आ. काळे
ओबीसी आरक्षणासाठी क्रिमीलेअरची मर्यादा वाढणार ?

प्रतिनिधी : नागपूर

विदर्भात चित्रपटनगरी स्थापन करण्याच्या प्रयत्नांना वेग आल्याचे दिसते. अभिनेता संजय दत्त याने नुकतीच केंद्रीय महामार्ग विकास मंत्री आणि भाजपाचे दिग्गज नेते नितीन गडकरी यांच्यासोबत नागपूरमध्ये चर्चा केली.

त्यानंतर महाराष्ट्राचे ऊर्जा मंत्री, काँग्रेस नेते आणि नागपूरचे पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांचीही भेट घेतली. राऊत आणि संजय दत्त यांनी रामटेक-खिंडसी परिसराची पाहणी केल्याची माहिती आहे. संजय दत्त अचानक नागपूरला आला होता.

दरम्यान, नितीन राऊत यांच्या नागपूर येथील बेझनबाग निवासस्थानी जाऊन जून महिन्यात संजय दत्तने संपूर्ण कुटुंबाची भेट घेतली होती. नितीन राऊतांच्या मुलाच्या लग्नाला उपस्थित राहू न शकल्यामुळे संजय दत्तने ही सदिच्छा भेट घेतली होती.

मंत्री डॉ. नितीन राऊत यांच्या मुलाचा २१ फेब्रुवारी २०२१ ला विवाह झाला होता. कोरोनामुळे त्या विवाहाचा स्वागत समारंभ रद्द झाला होता. संजय दत्तने सहा जून रोजी अचानक नागपूरला येऊन कुणाल-आकांशा दाम्पत्याला शुभेच्छा दिल्या होत्या. त्यानंतर आता पुन्हा संजय नागपूरला आला होता.

या संदर्भात उल्लेखनीय आहे की, विदर्भात चित्रनगरी उभारण्याचे स्वप्न बरेच जुने आहे. त्याला अद्याप मुहूर्त मिळाला नाही. संजय दत्तने नागपूर दौऱ्यात गडकरी आणि नितीन राऊत यांच्यासारख्या दोन पक्षांच्या दिग्गज नेत्यांशी भेट घेतल्याने चित्रनगरीनगरी संदर्भात हालचाली सुरू असल्याची चर्चा आहे.

COMMENTS