अहमदनगर प्रतिनिधी : अहमदनगर शहर इंद्रिरा प्रणित मागासवर्गीय विडी कामगारांची सहगृह निर्माण संस्थेने 1986 सालापासून विडी कामगारांना हक्काच्या घरासाठी ज
अहमदनगर प्रतिनिधी : अहमदनगर शहर इंद्रिरा प्रणित मागासवर्गीय विडी कामगारांची सहगृह निर्माण संस्थेने 1986 सालापासून विडी कामगारांना हक्काच्या घरासाठी जागा मिळावी. यासाठी महापालिकेच्या मार्फत शासन दरबारी पाठपुरावा केल्यामुळे नालेगाव परिसरामध्ये 132 विडी कामगाराना 300 स्केअर फुटची जागा मिळाली आहे. या कामासाठी कै. श्रीराम आडीगोपुल यांचे मोलाचे योगदान आहे. त्यामुळे या जागेला श्रीराम नगर असे नामकरण करण्यात आले. समाजाचे शहराच्या जडणघडणीत मोठे योगदान आहे.कै कृष्णा भाऊ जाधव यांनी विडी कामगारांचे प्रश्न सोडविण्यासाठी नेहमीच प्रयत्न केले आहे. आता त्याचे चिरंजीव ॲड. धनंजय जाधव विडी कामगारांचे प्रश्न सोडविण्यासाठी नेहमीच पाठपुरावा करीत असतात. विडी कामगारांना नालेगाव परिसरामध्ये सुमारे २ एकर जागा मिळाली असून पायाभूत सुविधांचे प्रश्न मार्गी लावणार असल्याचे प्रतिपादन आमदार संग्राम जगताप यांनी केले.
नालेगाव परिसरामध्ये अहमदनगर शहर इंदिरा प्रणित मागासवर्गीय विडी कामगारांची सहकारी गृहनिर्माण संस्थेच्या अंतर्गत २ एकर जागेच्या मूलभूत सुविधांच्या विकास कामांचा शुभारंभ आमदार संग्राम जगताप यांच्या हस्ते करण्यात आला. या वेळी माजी नगरसेवक ॲड. धनंजय जाधव, संस्थेचे चेअरमन दत्तात्रेय चिटमील, सचिव नारायण चिल्का, प्रदीप पत्की,अभी तौटी, वैभव वाघ, संतोष लांडे, सुनील सूडके, सुमन लाटे, ताराबाई निमसे, प्रल्हाद सायकर आदी उपस्थित होते. ॲड. धनंजय जाधव म्हणाले की विडी कामगारांच्या जागेसाठी अनेक वर्षापासून लढा सुरू होता. विविधा अडचणीला सामोरे जात आता खऱ्या अर्थाने त्यांना हक्काची जागा मिळाली आहे. लवकरच या ठिकाणी १३२ विडी कामगारांच्या हक्काचे घर हे उभे राहण्यासाठी आमचे प्रयत्न सुरू आहे. आमदार संग्राम जगताप यांचे या कामासाठी मोठे योगदान मिळाले आहे. सर्वांच्या सहकार्यामुळेच विडी कामगारांना आपल्या हक्काचे जागा मिळाली आहे असे ते म्हणाले. संस्थेचे चेअरमन दत्तात्रेय चिटमील म्हणाले की विडी कामगारांना जागा मिळावी यासाठी आम्ही अनेक वर्षापासून संघर्ष करीत होतो. आता ती जागा मिळाली आहे. विडी कामगार हा आर्थिक दृष्ट्या सक्षम नसल्यामुळे या जागेतील अंतर्गत सुधारणा करणे शक्य होणार नाही. यासाठी आमदार संग्राम जगताप यांनी जातीने लक्ष घालून रस्ते,पाणी, गटार, ड्रेनेज लाईन, लाईट इत्यादी मूलभूत सुविधा उपलब्ध करून द्यावे.जेणेकरून कामगारांना स्वतःचे घर बांधण्यास मदत होणार आहे. कै. श्रीराम आडीगोपुल यांनी विडी कामगारांना हक्काची जागा मिळावी यासाठी संघर्ष केला होता. आज खऱ्या अर्थाने त्यांच्या कामाला न्याय मिळाला आहे. आज ते आपल्यात नाहीत या जागेला त्यांचे नाव श्रीराम नगर नामकरण करण्यात असल्याचे ते म्हणाले.
COMMENTS