विठू नामाच्या गजरात धार्मिक व सामाजिक उपक्रम उत्साहात

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

विठू नामाच्या गजरात धार्मिक व सामाजिक उपक्रम उत्साहात

धाकटी पंढरी-अरणगावला विठ्ठलमूर्तीची पूजाअहमदनगर/प्रतिनिधी-कोरोना काळातील सलग दुसर्‍या वर्षीची आषाढी एकादशी मंगळवारी शहरातील विविध मंदिरांतून उत्साहात

नगरच्या उड्डाण पुलाचे काम अंतिम टप्प्याच्या दिशेने ; खांबांवर सिमेंट प्लेटा टाकल्या जाणार, सहा महिने चालणार काम
पर्यटनाच्‍या दृष्टिने पिंपळगाव माळवी तलाव परिसराचा विकास करणार. – मा.महापौर सौ.रोहिणीताई शेंडगे
राज्यात मान्सूनला ब्रेक ; पेरण्या रखडल्या

धाकटी पंढरी-अरणगावला विठ्ठलमूर्तीची पूजा
अहमदनगर/प्रतिनिधी-कोरोना काळातील सलग दुसर्‍या वर्षीची आषाढी एकादशी मंगळवारी शहरातील विविध मंदिरांतून उत्साहात झाली. यानिमित्त धार्मिक कार्यक्रम साधेपणाने झाले तसेच विविध स्वयंसेवी संस्थांद्वारे वृक्षारोपणासह विविध सामाजिक उपक्रम करण्यात आले. धाकटी पंढरी म्हणून ओळखल्या जाणार्‍या नगर तालुक्यातील अरणगाव येथील विठ्ठल मंदिरात विठ्ठल मूर्तीची साग्रसंगीत पूजा करण्यात आली. यावेळी कोरोनाचे नियम पाळण्यात आले होते.

कोरोनामुळे सुमारे दीड वर्षांपासून मंदिरे बंद आहेत. मागील वर्षीची आषाढी एकादशीही साधेपणाने साजरी झाली व यंदाही अशाच पद्धतीने साजरी करावी लागली. आषाढीनिमित्तच्या पायी दिंडी सोहळ्यांवरही निर्बंध असल्याने पंढरपूरलाही यंदा मानाच्या दहा दिंड्या एसटीने नेण्यात आल्या. या पार्श्‍वभूमीवर मंगळवारी सावेडीच्या गुलमोहोर रस्त्यावरील आनंदनगरमधील मंदिरात, जुन्या कोर्टामागील मंदिरात, डाळमंडईतील मंदिरात तसेच चितांबर कन्या विद्यामंदिराजवळील मंदिरासह पोलिस हेडक्वॉटर आणि दौंड रोडवरील हनुमाननगरमधील मंदिरात आषाढीनिमित्त विठ्ठल-रुक्मिणीची पूजा करण्यात आली.

अरणगावला धार्मिक उपक्रम
नगर तालुक्यातील अरणगाव येथे पुरातन काळातील श्रीविठ्ठल-रुक्मिणी मंदिर आहे. या मंदिरास धाकटी पंढरी म्हणून ओळखले जाते. यंदा आषाढी एकादशीचा उत्सव उत्साहात व धार्मिक कार्यक्रमांनी झाला. पहाटे जिल्हा परिषद सदस्य संदेश कार्ले, गोरख गहिले, सौ. छाया गहिले यांच्या हस्ते श्रीविठ्ठल-रुक्मिणी मूर्तीस दही-दुधाने स्नान घालून व काकड आरती झाली व विधिवत पूजा करण्यात आली. यावेळी देवस्थानचे अध्यक्ष ऋषिकेश जाधव, सुधाकर जाधव, हभप पंढरीनाथ महाराज दळवी, उपाध्यक्ष गणेश जाधव, आनंदा शेळके, मोहन नाथ, रामभाऊ शिंदे, शिवाजी पुंड, त्र्यंबक गाढवे, काशिनाथ गहिले, देशमुख, दत्तात्रेय पंडित, काशिनाथ गहिले, पोपट गहिले, सोमनाथ गहिले, पिंटू देशमुख, मोहन नाट, विश्‍वनाथ पाडळे, जगन्नाथ भटणे उपस्थित होते. अरणगाव येथील श्रीविठ्ठल-रुक्मिणी मंदिर खूप पुरातन असून, ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या काळातील आहे. कोरोनामुळे शासकीय नियमांचे पालन करून यंदाचा उत्सव साजरा केला गेला. कोरोनाचे संकट लवकर दूर व्हावे व सर्वांना उत्तम आरोग्य लाभावे, अशी प्रार्थना सर्वांनी यावेळी केली.

महापौरांच्या हस्ते आरती
आषाढी एकादशीनिमित्त माळीवाडा येथील शहराचे ग्रामदैवत श्रीविशाल गणेश मंदिर परिसरातील श्रीसंत सावता महाराज मंदिरातील विठ्ठल-रुक्मिणी यांची महापूजा महापौर सौ.रोहिणी व संजय शेंडगे यांच्या हस्ते करण्यात आली. यावेळी श्रीविशाल देवस्थानचे अध्यक्ष अ‍ॅड.अभय आगरकर, उपाध्यक्ष पंडितराव खरपुडे, सचिव अशोक कानडे, विश्‍वस्त विजय कोथिंबीरे, पांडुरंग नन्नवरे, हरिश्‍चंद्र गिरमे, चंद्रकांत फुलारी, बापूसाहेब एकाडे, अर्जुनराव बोरुडे, दत्ता जाधव उपस्थित होते. कोरोनाचे संकट दूर होऊन नगर शहर विकास पथावर राहील, असा विश्‍वास यावेळी महापौर शेंडगे यांनी व्यक्त केला. कोरोनाचे संकट दूर करुन शहरात सुख-समृद्धी नांदू दे, अशी प्रार्थना आपण विठ्ठल चरणी केली आहे, असे सांगून त्या म्हणाल्या, नागरिकांना सोयी-सुविधा देण्याबरोबरच नगर शहराच्या वैभवात भर पडेल, असे प्रकल्प आणण्याचा आपला प्रयत्न राहील, असेही त्यांनी सांगितले.

कल्याणरोडला वृक्षारोपण
नगर-कल्याण रोडवरील समाधान नगर येथे आषाढी एकादशीनिमित्त महापौर रोहिणी शेंडगे यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी नगरसेवक शाम नळकांडे, सचिन शिंदे यांच्यासह प्रमोद जरे, प्रफुल्लसिंग परदेशी, रवींद्र पांडे, बाळासाहेब निवडुंगे, राजू तांबोळी, भगवान गायसमुद्रे, काशिनाथ गोलवड, सचिन गोलवड, शरद दाते, बाळासाहेब पवार, संदीप धोत्रे, नसरूद्दीन सय्यद, एकनाथ भोगाडे, संजय घायवट, इम्रान तांबोळी, संपत पंडित, भास्कर सोनवणे, प्रितम बिज्जा, दीपक नवले, सुनीलसिंग परदेशी, संध्याताई धायवट, ताराबाई धोत्रे, आशाताई पवार, सोनालीताई दाते, स्नेहलताई शिंदे, पूजाताई जरे, रोहिणीताई जबे, सीमाताई ठाकूर, सवित्राताई पांडे, रोहिणीताई शेळके, रेखाताई रासकर, वैशालीताई खोपे, रेश्माताई पंडित, प्रणालीताई नवले, सुनीताताई थोरात, शोभाताई न्यायपेल्ली, छायाताई नवले, रंजनाताई खरमाळे उपस्थित होते. समाधान नगर येथील नागरिक आपली नोकरी व व्यवसाय संभाळून वृक्षारोपणासारखे सामाजिक कर्तव्य पार पाडण्याचे कामे करीत असून,तेे समाजासाठी प्रेरणादायी आहे, असे कौतुक महापौर शेंडगे यांनी यावेळी केले. वृक्षारोपण ही एक लोकचळवळ व्हावी यासाठी प्रयत्न करण्याचे आवाहनही त्यांनी केले.

अर्बन बँक कॉलनीत महापूजा
नगर-औरंगाबाद रोडवरील अर्बन बँक कॉलनीमधील प्रतिपंढरपूर असलेल्या विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात आषाढी एकादशीनिमित्त महापूजा व आरती करण्यात आली. यावेळी उद्योजक आशिष ब्रह्मे व स्मिता ब्रह्मे यांच्यासह आदिनाथ जोशी, मनोज पारखे, विश्‍वनाथ जोशी, अभिजित जोशी, राहुल जोशी, प्रज्ञा जोशी, आनंदीबाई हरबा, छाया दरवडे, श्रीमती मंगला पारखे, संदीप यादव, भार्गव जोशी उपस्थित होते. पांडूरंग पांडूरंग नावाचा धावा करुन पंढरीच्या दिशेने हात जोडले तरी विठ्ठल भक्तांना आशिर्वाद देतो तसेच संसारात राहूनही परमार्थ करण्याचा आनंद देणारा पंढरपूरचा पांडूरंग भक्तांना पावन होतो, असे प्रतिपादन ब्रह्मे यांनी यावेळी केले.

दिंडी-प्रदक्षिणा रंगली
सावेडी भागातील पाईपलाईन रस्त्यावर असलेल्या बायजाबाई सोसायटीत आषाढी-एकादशी निमित्त विठ्ठल-रुक्मिणी मंदिराभोवती दिंडी प्रदक्षिणा झाली. यावेळी माजी नगरसेवक बाळासाहेब पवार यांच्यासह नगरसेविका संध्याताई पवार, नगरसेवक सुनील त्र्यंबके, विनित पाउलबुधे तसेच निखिल वारे, श्रीमती जनाबाई पवार, योगेश पिंपळे, विद्या देशमुख, भास्कर हांडे, प्रकाश देशमुख, विकास जगताप, राजेंद्र भापकर, अर्जुन मिसाळ, भीमराव खेडकर, विजय पवार, शिवाजी सांगळे, यशवंत तोडमल, पंढरीनाथ खोसे, भीमराव घोडके उपस्थित होते. बायजाबाई सोसायटीचे अध्यक्ष (स्व.) आर.एम.पवार यांनी या मंदिर उभारणीसाठी पुढाकार घेतला होता. मंदिर-मूर्ती स्थापनेपासून येथे आषाढीला मंदिर प्रदक्षिणा सोहळा होतो. यंदा कोरोनामुळे गर्दी टाळून थोड्याच वारकर्‍यांच्या उपस्थितीत परंपरा म्हणून प्रदक्षिणा झाली. यामध्ये सीताराम पालवे, बाळासाहेब कांबळे, राजेंद्र जाधव, बाजीराव नरवडे सहभागी झाले होते.

भिंगारमध्ये वृक्षारोपण
आषाढी एकादशीनिमित्त हरदिन मॉर्निंग ग्रुपच्यावतीने भिंगार येथील कॅन्टोन्मेंट बोर्डच्या भगवान गौतमबुध्द जॉगिंग पार्कमध्ये वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी ग्रुपचे संस्थापक-अध्यक्ष संजय सपकाळ, रमेश वराडे, दीपक बडदे, सर्वेश सपकाळ, श्रीरंग देवकुळे, अजेश पुरी, विकास भिंगारदिवे, जालिंदर बोरुडे, विकास निमसे, सूर्यकांत कटोरे, रमेश कडूस, मनोहर पाडळे, राजू कांबळे, दिलीप बोंदर्डे, किरण फुलारी, संतोष रासकर, सुधीर दहीफळे, नितीन पाटोळे, माधव भांबुरकर, गणेश नगरे, राहुल मोहिरे, अब्बासभाई शेख, दीपक बोंदर्डे, अतुल वराडे, विलास दळवी, सुधाकर चिदंबर, सरदारसिंग परदेशी, बाबासाहेब तांबे, राहुल दिवटे आदी उपस्थित होते. यावेळी विठ्ठलाला भरपूर पाऊस पडू दे, शिवार बहरु दे, प्रत्येकास धनधान्य येऊ दे व कोरोनारुपी संकटाचे नायनाट करण्याचे साकडे घालण्यात आले.

निमगावला पर्यावरण संदेश फेरी
नगर तालुक्यातील निमगाव वाघा येथे पर्यावरणाचा संदेश देत गावात वारकर्‍यांची फेरी काढून वृक्षारोपण करण्यात आले. तसेच ग्रामस्थांना प्रसादरुपात झाडांचे वाटप झाले. (स्व.) किसनराव डोंगरे बहुद्देशीय संस्था व श्री नवनाथ युवा मंडळाच्या पुढाकाराने गावातील सर्व मंदिराच्या प्रांगणात वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी संदीप गुंड, नगर तालुका पंचायत समितीचे उपसभापती डॉ.दिलीप पवार, माजी सभापती रामदास भोर, शिवसेनेचे तालुका प्रमुख राजेंद्र भगत, उपतालुका प्रमुख जिवाजी लडग, ग्रामपंचायत सदस्य नाना डोंगरे, माजी सरपंच साहेबराव बोडखे, वीणेकरी सुनील जाधव, भागचंद जाधव, बन्सी जाधव, हभप संजय महाराज कांडेकर, लक्ष्मण चौरे, श्रीनवनाथ दिंडी सोहळ्याचे अध्यक्ष एकनाथ डोंगरे, भाऊसाहेब ठाणगे, डॉ. विजय जाधव, किरण जाधव, अनिल डोंगरे, लक्ष्मी जाधव, सदाशिव बोडखे, आशाबाई ठाणगे, बाळू कापसे, द्रोपदा कापसे, निर्मला डोंगरे, मयुर काळे, संदीप डोंगरे, सचिव प्रतिभा डोंगरे, संजय कापसे, अरुण कापसे, भरत फलके उपस्थित होते. कोरोनामुळे गावातील पायी दिंडी सोहळा रद्द करण्यात आल्याने गावकर्‍यांनी टाळ-मृदुंगाच्या निनादात ज्ञानबा तुकारामच्या गजरात गावातून नवनाथांच्या पादुका रथासह फेरी काढली. या फेरीतून पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यात आला.

COMMENTS