विकास कामांमध्ये महिला अव्वलस्थानी- डॉ. प्रतिभाताई पाचपुते

Homeताज्या बातम्याशहरं

विकास कामांमध्ये महिला अव्वलस्थानी- डॉ. प्रतिभाताई पाचपुते

श्रीगोंदा प्रतिनिधी:-आज कोळगाव जिल्हा परिषद गट अंतर्गत, जिल्हा परिषद सदस्य सौ. ताराकाकी दिनकर पंधरकर यांच्या स्थानिक विकास निधीतून घारगाव व कोथुळ

रोटरी क्लब शेवगाव आयोजित सूर नवा ध्यास नवा दिवाळी पहाट कार्यक्रम संपन्न
मृतदेहाची नोंद न करता परस्पर अंत्यविधी करणार्‍यावर कारवाई व्हावी
खरवंडी कासार परिसरातील विविध प्रश्नाबाबत आंदोलन करणार – अंकुश कासुळे

श्रीगोंदा प्रतिनिधी:-
आज कोळगाव जिल्हा परिषद गट अंतर्गत, जिल्हा परिषद सदस्य सौ. ताराकाकी दिनकर पंधरकर यांच्या स्थानिक विकास निधीतून घारगाव व कोथुळ या ठिकाणी विविध विकास कामांचे उद्घाटन डॉ. प्रतिभाताई बबनराव पाचपुते यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी त्यांच्या सोबत कार्यक्रमास जिल्हा परिषद सदस्य ताराकाकी पंदरकर, दिनुकाका पंदरकर, बाळासाहेब महाडिक, संदीप नागवडे, संतोषजी लगड, भैय्यासाहेब लगड, अनुजाताई गायवाकड, शहाजीराव हिरवे, नितीन आण्णा नलगे, संकेत जंजीरे, डॉ.चंद्रशेखर कळमकर, अरुणा रमेश खोमणे, सोपान शिंदे, रघुनाथ अण्णा खामकर, रामदास झेंडे, तसेच घारगाव व कोथुळ मधील ग्रामस्थ व कार्यकर्ते उपस्थित होते.


घारगाव येथे बांदल मळा डांबरी रस्ता उद्घाटन प्रसंगी बोलताना सौ. पाचपुते म्हणाल्या कि, मा.जि.प.सदस्य दिनुकाका यांनी कोळगाव जिल्हा परिषद गटामध्ये अत्यंत उत्कृष्ट काम करून लोकांचा विश्वास संपादन केला. त्यांच्याच पावलावर पाऊल ठेऊन त्यांच्या सुविद्य पत्नी व सद्य जिल्हा परिषद सदस्या सौ. ताराकाकी पंदरकर यांनी कामांचा धडाका लावला आहे

तसेच आढळगाव गटाच्या जिप सदस्या पंचशीला गिरमकर व येळपणे गटाच्या जिप सदस्या कोमल वाखारे यांनीही आपापल्या गटांमध्ये भरीव विकास कामे नावलौकीक मिळवला आहे हे पाहता महिला कुठल्याही क्षेत्रात पुरुषांपेक्षा कमी नसुन अव्वल आहेत हे मान्यच करावे लागेल असे गौरवोदगार पाचपुते यांनी या प्रसंगी काढले.

COMMENTS