वाहतुकीला अडथळा ठरणारी वाहने पोलिसांच्या रडारवर ; शहर वाहतूक शाखेची दंडात्मक कारवाई

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

वाहतुकीला अडथळा ठरणारी वाहने पोलिसांच्या रडारवर ; शहर वाहतूक शाखेची दंडात्मक कारवाई

अहमदनगर/प्रतिनिधी : नगर शहरामध्ये वाहतुकीची समस्या मोठ्या प्रमाणावर भेडसावत चालली आहे. नगर शहरातील रस्त्यामध्ये अनेक दिवसापासून बंद पडलेली वाहने अथवा

परदेशातील शिक्षणासाठी भारताचे धोरण उपयुक्त ः डॉ. सुनील गोरंटीवार
*पोलिसांच्या सतर्कतेमुळे दरोड्याचा प्रयतन फसला l LokNews24*
तीन जूनला भाजपचे आक्रोश आंदोलन**भाजप प्रदेश उपाध्यक्ष प्रा. राम शिंदे यांची घोषणा

अहमदनगर/प्रतिनिधी : नगर शहरामध्ये वाहतुकीची समस्या मोठ्या प्रमाणावर भेडसावत चालली आहे. नगर शहरातील रस्त्यामध्ये अनेक दिवसापासून बंद पडलेली वाहने अथवा रस्त्यावर लावलेल्या वाहनांच्या संदर्भात आता दंडात्मक कारवाई करण्याचा निर्णय शहर वाहतूक शाखेने घेतला असून त्याची अंमलबजावणी सुरू करण्यात आली आहे. नगर शहरामध्ये अरुंद रस्ते असल्यामुळे वाहतूक कोंडीची मोठी समस्या सर्वत्र निर्माण झालेली आहे. त्यातच रस्त्याच्या दोन्ही बाजूने व चार चाकी वाहने मोठ्या प्रमाणात उभी केली जातात. तर यामध्ये अनेक वाहने ही अनेक वर्षापासून त्याच जागेवर पडून आहेत. त्यामुळे रहदारीला अडथळा निर्माण होत आहे. या बाबींचा विचार करता शहरातील वाहतूक सुरळीत करण्याच्या दृष्टिकोनातून शहर वाहतूक शाखेने आता धडक कारवाई हाती घेतली आहे. रस्त्याच्या बाजूला जी वाहने वर्षानुवर्षे पडून आहेत, अशा वाहनांच्या संदर्भामध्ये दंडात्मक कारवाई करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. रस्त्याच्या बाजूला असलेली वाहनांची तपासणी मोहीम शहर वाहतूक शाखेच्यावतीने सुरू करण्यात आली आहे. ही कारवाई करताना जी वाहने अनेक वर्षापासून रस्त्यामध्ये पडून आहेत, ती जर सात दिवसाच्या आतमध्ये हलवली नाही तर त्या वाहनांवर प्रति तास 50 रुपये याप्रमाणे दंडात्मक कारवाई केली जाणार आहे. सात दिवसाच्या आत जर वाहने काढली नाहीत तर त्यांच्यावर रीतसर दंडात्मक कारवाई करून न्यायालयामध्ये पुढील कारवाईसाठी शहर वाहतूक शाखा धाव घेणार आहे.

सातजणांना नोटिसा
नगर शहरातील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर असलेल्या मुख्य रस्त्यावर मंगळवारी शहर वाहतूक शाखेने रस्त्यालगत असणार्‍या वाहनांची तपासणी करून संबंधित गाडी चालक तसेच गाडी नंबर घेऊन त्यांची शोध मोहीम सुरु केली आहे. 7 जणांना नोटिसा सुद्धा बजावलेल्या आहेत. आगामी काळामध्ये शहरातील वाहतूक व्यवस्था सुरळीत करण्याच्या दृष्टिकोनातून शहर वाहतूक शाखेने आता ही धडक मोहीम हाती घेतली आहे. रस्त्याच्या कडेला असलेल्या व वाहतुकीला अडथळा निर्माण करणार्‍या वाहनांवर कारवाई सुरू झाल्यामुळे अनेकांचे धाबे दणाणले आहे.

COMMENTS