Homeमहाराष्ट्र

वारणा कारखान्याच्या विरोधात आंदोलनचा इशारा : भागवत जाधव

वारणा सहकारी साखर कारखान्याने फेब्रुवारी महिन्यापासून एक रुपायाही शेतकर्‍यांच्या खात्यावर जमा केलेले नाही.

सोलापूरच्या चार हुतात्म्यांवरील पोस्ट तिकिटाचे अनावरण (Video)
पत्नीच्या डोक्यात लोखंडी वॉल घालून खून | LOKNews24
वाहतूकदारांचे प्रश्न सोडविण्यास प्राधान्य : उर्मिला पवार

इस्लामपूर / प्रतिनिधी : वारणा सहकारी साखर कारखान्याने फेब्रुवारी महिन्यापासून एक रुपायाही शेतकर्‍यांच्या खात्यावर जमा केलेले नाही. येत्या 10 जुलैच्या आत एफ्आरपीची रक्कम शेतकर्‍यांच्या खात्यावर जमा केली नाही तर वारणा कारखान्याच्या विरोधात मोठे आंदोलन उभा करणार असल्याचा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते भागवत जाधव यांनी दिला.

भागवत जाधव म्हणाले, वाळवा व शिराळा या तालुक्यातील शिगाव ते सागाव या कारखान्याचे 57 गावामध्ये कार्यक्षेत्र आहे. फेब्रुवारी महिन्यापासून उसाची एक दमडी सुध्दा शेतकर्‍यांना मिळाली नाही. याच बरोबर वाहतूकदाराने कामगारांची बिले दिली नाहीत. खरीप हंगामातील पेरणी, टोकणी, रासायनिक खते, बी-बीयाणे यासाठी शेतकर्‍यांना पैसेची गरज असते. आपल्या हक्काचे पैसे मिळत नसल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे.

ऊस उत्पादकाच्या उसाच्या बिलातून विकास सोसायटी, सहकारी बँका कर्जाचा बोजा शेतकर्‍यांच्या अंगावर परत पडणार आहे. सोसायटी फिरवा-फिरवी करायला शेतकर्‍यांच्या जवळ पैसे नसल्याने शेतकर्‍यांना बँका दारात उभे करुन देत नाहीत. शिगाव ते सागाव कार्यक्षेत्रातील शेतकर्‍यांच्या वारणा सहकारी साखर कारखान्याच्या विरोधात असंतोष वातावरण आहे. कारखान्याचे संचालक मुग गिळून बसले आहेत. यापुढे स्वाभिमानी शेतकरी संघटना गप्प बसणार नाही, असा इशारा जाधव यांनी दिला.

आमदार सावकार घरात … शेतकरी खाजगी सावकाराच्या दरात

शाहुवाडी, पन्हाळा तालुक्याचे आमदार सावकार विनय कोरे हे सध्या बिलाच्या संदर्भात निंवात आहेत. त्यांनी कुठलीच भूमिका घेतलेली दिसत नाही. कोरोनामुळे वारणा पट्ट्यातील ऊस उत्पादक शेतकरी आता खाजगी सावकारांच्या दारात उभा आहे. त्यामुळे वारणा पट्ट्यासह वाळवा व शिराळा तालुक्यातील शेतकरी आमदार सावकार यांच्यावर नाराज आहेत

COMMENTS