Homeमहाराष्ट्रशहरं

वाडियापार्कमध्ये रंगणार राज्य आंतरजिल्हा व महाराष्ट्र राज्य अजिंक्यपद बॅडमिंटन स्पर्धा

अहमदनगर : शहरातील वाडियापार्क येथील बॅडमिंटन हॉलमध्ये रविवारी (दि.7 जुलै) 17 वर्षा आतील मुले व मुलींची महाराष्ट्र राज्य आंतरजिल्हा स्पर्धा आणि 15

मनोज जारांगे यांच्या उपोषणाला निमगाव को. ग्रामस्थांचा पाठिंबा
केंद्रीय मंत्री अजय मिश्रा यांना नथुराम-डायर मंत्री घोषित करणार
शिर्डी शहर शंभर टक्के सौर शहर करण्यासाठी सर्वांच्या सहकार्याची गरज :  संचालक प्रसाद रेशमे

अहमदनगर : शहरातील वाडियापार्क येथील बॅडमिंटन हॉलमध्ये रविवारी (दि.7 जुलै) 17 वर्षा आतील मुले व मुलींची महाराष्ट्र राज्य आंतरजिल्हा स्पर्धा आणि 15 वर्ष आतील मुले व मुलींची महाराष्ट्र राज्य अजिंक्यपद बॅडमिंटन स्पर्धेचे उद्घाटन आमदार संग्राम जगताप यांच्या हस्ते होणार आहे. सहा दिवस रंगणाऱ्या या स्पर्धेसाठी 32 जिल्ह्यातून 600 खेळाडू शहरात दाखल झाले आहेत. तर 60 संघांचा समावेश आहे. या स्पर्धेतून महाराष्ट्र राज्य बॅडमिंटन संघाची निवड करण्यात येणार असल्याची माहिती असोसिएशनचे अध्यक्ष अशोक कोठारी, उपाध्यक्ष नरेंद्र फिरोदिया व बॅडमिंटन असोसिएशनचे सचिव व महाराष्ट्र बॅडमिंटन असोसिएशनचे सदस्य मिलिंद कुलकर्णी यांनी दिली.
महाराष्ट्र बॅडमिंटन असोसिएशन यांच्या मान्यतेने व नगर बॅडमिंटन असोसिएशनच्या सहकार्याने बॅटलडोर बॅडमिंटन असोसिएशनच्या वतीने कै. श्रीमती संजीवनी कुलकर्णी यांच्या स्मरणार्थ या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. 7 जुलै ते 8 जुलै दरम्यान 17 वर्षा आतील मुले व मुलींची महाराष्ट्र राज्य आंतरजिल्हा स्पर्धा होणार आहे. तर 9 ते 12 जुलै दरम्यान वैयक्तिक अजिंक्यपद स्पर्धा रंगणार आहे.
ही स्पर्धा आयोजन करण्याचा सलग दुसऱ्यांदा मान अहमदनगर जिल्ह्याला मिळाला आहे. या स्पर्धेसाठी योनेक्स सनराइज या कंपनीचे मुख्य स्पॉन्सरशिप मिळाली आहे. स्पर्धेसाठी निरीक्षक म्हणून महाराष्ट्र बॅडमिंटन असोसिएशन कडून मयूर घाटनेकर (ठाणे), मनोज कान्हेरे (सातारा) उपस्थित राहणार आहे. या स्पर्धेसाठी जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाचे सहकार्य मिळत आहे.
वाडियापार्कच्या बॅडमिंटन हॉलमधील कोर्टवर एकाच वेळेस 8 मॅचेस चालणार आहे. दिवसाला 300 मॅचेसचे नियोजन करण्यात आले आहे. सकाळी 9 वाजल्यापासून स्पर्धेला प्रारंभ होणार असून, रात्री 9वाजेपर्यंत स्पर्धा रंगणार आहे. स्पर्धेच्या दृष्टीकोनाने उत्कृष्ट नियोजन करण्यात आले आहे.

COMMENTS