मालाड येथे धोकादायक इमारत कोसळल्याची घटना नुकतीच घडली. वसई-विरारमध्ये अशा घटना घडू नयेत, यासाठी महापालिकेने अतिधोकादायक इमारतींवर तोडक कारवाई करण्याचे सत्र हाती घेतले.
मुंबई / प्रतिनिधीः मालाड येथे धोकादायक इमारत कोसळल्याची घटना नुकतीच घडली. वसई-विरारमध्ये अशा घटना घडू नयेत, यासाठी महापालिकेने अतिधोकादायक इमारतींवर तोडक कारवाई करण्याचे सत्र हाती घेतले. आतापर्यंत सुमारे 14 अतिधोकादायक इमारती जमीनदोस्त केल्याचे महापालिकेने सांगित17
वसई- विरार हद्दीत मागील वर्षी पावसाळ्यात नालासोपारा पूर्वेकडील 11 वर्षे जुनी ’साफल्य’ ही धोकादायक इमारत कोसळल्याची घटना घडली होती. मे महिन्यामध्ये विरार, नारंगी येथील नाना अपार्टमेंट या धोकादायक इमारतीचा सज्जा कोसळला होता, तर राज्यातही काही ठिकाणी धोकादायक इमारती कोसळल्याच्या घटना घडल्या होत्या. त्यामुळे पावसाळ्यात धोकादायक इमारतींच्या दुर्घटनेला सामोरे जावे लागू नये, यासाठी वसई-विरार महापालिका क्षेत्रातील धोकादायक आणि अतिधोकादायक इमारतींचे सर्वेक्षण करून महापालिकेने यादी जाहीर केली. यामध्ये 126 अतिधोकादायक इमारती आणि 445 धोकादायक इमारतींचा समावेश असल्याचे समोर आले. या इमारतींना नोटिसा बजावण्यात आल्या. घरे रिकामी करण्याबाबत सांगण्यात आले; मात्र तरीही काही इमारतींमधील रहिवासी घरे रिकामी करण्यास तयार नव्हते; मात्र र्लीशपालिकेकडून या इमारती रिकाम्या करण्याचे काम तत्काळ सुरू करण्यात आले. महापालिकेने मागील वर्षी जाहीर केलेल्या इमारतींपैकी 54 अतिधोकादायक इमारती जमीनदोस्त केल्या आहेत. तसेच यंदा जाहीर केलेल्या इमारतींपैकी काही अतिधोकादायक इमारती निष्कासित करण्याचे काम मागील आठवड्यात सुरू केले होते. नुकतेच प्रभाग समिती आय अंतर्गत वसई गाव येथील एका धोकादायक इमारतीवर कारवाई केली असून याच प्रभागातील दरपाळे गावातील दोन अतिधोकादायक चाळींवर मंगळवारी कारवाई करण्यात आली. तसेच सोमवारी नालासोपारा पूर्वेकडील रहमत नगर येथे अतिधोकादायक इमारत जमीनदोस्त केली. विरारमधील प्रभाग समिती क अंतर्गत येणार्या गावडवाडी व चंदनसार परिसरातील अतिधोकायदाक इमारतही भुईसपाट करण्यात आली. गावडवाडी परिसरातील मधु निवास, जीवन निवास, मुकुंद निवास आणि नारायण निवास या इमारतींतील रहिवाशांना बाहेर काढण्यात आले. त्याचप्रमाणे नारायण निवास आणि चंदनसारमधील जीवदानी इमारतीवर कारवाई केली गेली. त्यामुळे आतापर्यंत पालिका हद्दीतील सुमारे 14 अतिधोकादायक इमारतींवर महापालिकेने कारवाई केल्याचे सांगण्यात आले.
COMMENTS