Homeमहाराष्ट्रमुंबई - ठाणे

वसई-विरारमध्ये मनसे-बविआ युती ?

ठाकरे गटाच्या पावित्र्यामुळे युतीवर प्रश्‍नचिन्ह मुंबई : राज्यातील 29 महानगरपालिका निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्यासाठी अवघे काही दिवस शिल्लक असतांनच

ब्रम्हलीन स्वामी सागरानंद सरस्वतीजी महाराजांची मुर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळा संपन्न 
त्रिवेणीश्‍वर येथील श्रीमद भागवत कथा सोहळयाचे ध्वजपूजन उत्साहात
प्रेमीयुगुलाची रेल्वेखाली उडी घेऊन आत्महत्या | LOKNews24

ठाकरे गटाच्या पावित्र्यामुळे युतीवर प्रश्‍नचिन्ह
मुंबई : राज्यातील 29 महानगरपालिका निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्यासाठी अवघे काही दिवस शिल्लक असतांनच विविध पक्षांकडून अजुनही उमेदवार फायनल झाले नाही, तर अनेक ठिकाणी युती आणि आघाडीचे घोळ सुरू असल्याचे दिसून येत आहे. त्यातच वसई-विरारमध्ये मात्र समीकरणे पूर्णपणे बदलताना दिसत आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, वसई-विरार महानगरपालिका निवडणुकीत महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि बहुजन विकास आघाडी एकत्र येऊन निवडणूक लढवणार आहेत. या युतीमुळे स्थानिक राजकारणात मोठी खळबळ उडाली असून अनेक पक्षांची गणितं बदलण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
सूत्रांच्या माहितीनुसार, मनसे आणि बहुजन विकास आघाडी यांच्यातील युती जवळपास निश्‍चित झाली असून अंतिम घोषणा लवकरच होण्याची शक्यता आहे. वसई-विरारमध्ये मनसेची सध्या एकही नगरसेवकाची जागा नसल्याने पक्ष विस्तारासाठी मनसेने हा महत्त्वाचा निर्णय घेतल्याचे बोलले जात आहे. दुसरीकडे बहुजन विकास आघाडीने युतीसाठी अट ठेवली असून, भाजप आणि शिंदे गटाच्या शिवसेनेला सत्तेपासून दूर ठेवायचे असेल तर आपल्या पक्षाच्या चिन्हावरच निवडणूक लढवावी लागेल, अशी भूमिका बविआकडून मांडण्यात आली आहे. या चिन्हाच्या अटीवर मनसेमध्ये अंतर्गत चर्चा सुरू असून येत्या दोन दिवसांत याबाबत अंतिम निर्णय घेतला जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या युतीमुळे वसई-विरारमधील राजकीय समीकरणे पूर्णपणे बदलू शकतात. दरम्यान, या घडामोडींमध्ये ठाकरे गटाची शिवसेना मात्र स्वबळावर निवडणूक लढवण्याच्या तयारीत असल्याची माहिती समोर आली आहे. मनसे आणि बविआसोबत जाण्याबाबत ठाकरे गटाकडून सकारात्मक प्रतिसाद नसल्याचे सूत्रांकडून सांगितले जात आहे. त्यामुळे वसई-विरारमध्ये यावेळी त्रिकोणी किंवा चौरंगी लढत पाहायला मिळण्याची शक्यता आहे. एकीकडे बविआ-मनसे युती, दुसरीकडे भाजप-शिंदे गट आणि त्याचवेळी ठाकरे गटाची शिवसेना स्वतंत्र मैदानात उतरणार असल्याने निवडणूक अधिक चुरशीची ठरणार आहे. स्थानिक पातळीवर कार्यकर्त्यांची जुळवाजुळव, जागावाटप आणि प्रचार रणनीती यावर सध्या सर्वच पक्षांचे लक्ष केंद्रित झाले आहे.

COMMENTS