काय करत होताशाळेच्या सुट्यांच्या काळात 12 वर्षांच्या बेन्यामिन अहमदनं 'वीयर्ड व्हेल्स' नावाचं पिक्सलेटेड आर्टवर्क तयार केलं. ते विक्री करून त्यानं तब
काय करत होता
शाळेच्या सुट्यांच्या काळात 12 वर्षांच्या बेन्यामिन अहमदनं ‘वीयर्ड व्हेल्स’ नावाचं पिक्सलेटेड आर्टवर्क तयार केलं. ते विक्री करून त्यानं तब्बल दोन कोटी रुपयांची कमाई केली आहे.
कोठे विकले
बेन्यामिननं हे डिजिटल फोटो एनएफटी (नॉन फंजिबल टोकन्स) इथून विकले. त्याठिकाणी या कलाकृतीसाठी त्याला जवळपास दोन कोटी 93 लाख रुपये मिळाले.
एनएफटीच्या माध्यमातून एखाद्याची कलाकृती ‘टोकन’ करता येते. त्यामुळं एक डिजिटल सर्टिफिकेट तयार होतं आणि त्यानंतर कलाकृतीची खरेदी किंवा विक्री केली जाऊ शकते.
• कोडिंग म्हणजे काय? मुलांनी खरंच इतक्या लहान वयात कोडिंग शिकण्याची गरज आहे?
• गायतोंडेंच्या चित्रासाठी 39.98 कोटी रुपयांची बोली का लागली?
परंतु यात खरेदी करणाऱ्याला प्रत्यक्ष कलाकृती किंवा त्याचे कॉपीराईट देत नाहीत.
बेन्यामिन अहमदला एथेरियम (क्रिप्टो करंसी) च्या रुपात मोबदला देण्यात आला आहे. म्हणजेच त्याच्या कलाकृतींची किंमत वाढूही शकते अथवा कमीदेखील होऊ शकते.
अभिमानाचा क्षण
बेन्यामिनबरोबर शिकणाऱ्या मुलांना कदाचित अद्याप हे माहितीही नसेल की, त्यांच्या एका मित्रानं घर बसल्या दोन कोटी रुपयांची कमाई केली आहे.
बेन्यामिनचा इतरांना सल्ला
“ज्या इतर मुलांना या क्षेत्रात येण्याची इच्छा असेल त्यांनी कुणाच्या दबावात येऊन किंवा बळजबरीनं कोडींग करू नये, असा माझा सल्ला आहे. कदाचित तुम्ही इतरांच्या दबावात असू शकता. पण आपल्या क्षमतेप्रमाणेच ते करा,” असं बेन्यामिन सांगतो.
बन्यामीनचे वडील काय सांगतात
बेन्यामिनचे वडील इम्रान एक सॉफ्टवेअर डेव्हलपर आहेत. त्यांनीच बेन्यामिन आणि त्याचा भाऊ यूसफ यांना पाच आणि सहा वर्षांचे असल्यापासून कोडींग करण्यासाठी प्रोत्साहन दिलं होतं.
“मुलांना या क्षेत्रातील तज्ज्ञांशी बोलून आणि त्यांच्या सल्ल्यामुळं मदत झाली हे खरं आहे. पण तसं असलं तरी ते हे करू शकले ही अभिमानाची बाब आहे,” असं इम्रान म्हणाले.
गांभीर्यानं शिकले
“हे सर्व काहीतरी गमतीशीर शिकायचं म्हणून सुरू झालं होतं. पण मुलांना ते आवडत आहे आणि ते गांभीर्यानं शिकत असल्याचं लवकरच माझ्या लक्षात आलं. ते वेगानं पुढं जात होते,” असं इम्रान सांगतात.
“मुलाचं पाहून आम्हीदेखील गांभीर्यानं त्यांना शिकवू लागलो. त्यानंतर आजचा दिवस उगवला जो आपल्या सर्वांसमोर आहे. पण तुम्ही याचं मुल्यांकन करू शकत नाही. मी तीन महिन्यांत कोडींग शिकणार आहे, असं तुम्ही म्हणू शकत नाही.”
दोन्ही मुलांनी रोज 20 ते 30 मिनिटं कोडिंगचा सराव केला आणि सुटीच्या दिवशीही त्यांनी ते सुरू ठेवलं, असं त्यांनी सांगितलं. त्याच्या प्रोग्रामद्वारे 3,350 प्रकारचे इमोजी सारखे व्हेल तयार केले.
“ते सर्व हॅच करताना पाहणं रंजक होतं कारण हळूहळू ते माझ्या स्क्रीनवर तयार होत होतं,” असं बेन्यामिननं म्हटलं आहे.
बेन्यामिननं सध्या त्याच्या सुपरहिरो-थीम असलेल्या तिसऱ्या संग्रहावर काम करायला सुरुवात केली आहे.
त्याने हेच केल
त्याच्या प्रोग्रामद्वारे 3,350 प्रकारचे इमोजी सारखे व्हेल तयार केले.
“ते सर्व हॅच करताना पाहणं रंजक होतं कारण हळूहळू ते माझ्या स्क्रीनवर तयार होत होतं,” असं बेन्यामिननं म्हटलं आहे.
बेन्यामिननं सध्या त्याच्या सुपरहिरो-थीम असलेल्या तिसऱ्या संग्रहावर काम करायला सुरुवात केली आहे.
COMMENTS