वकील संघटनेने करोना संकटात केलेले मदत व जागृतीचे कार्य अभिनंदनास्पद : जिल्हा न्यायाधीश मिलिंद कुर्तडीकर

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

वकील संघटनेने करोना संकटात केलेले मदत व जागृतीचे कार्य अभिनंदनास्पद : जिल्हा न्यायाधीश मिलिंद कुर्तडीकर

नगर – जिल्हा न्यायलयात वकील व न्यायिक अधिकारी यांच्यात खेळीमेळीचे वातावरण आहे. गेल्या दीड वर्षांपासून असलेले करोनाचे सावट दूर होत आहे. वकील संघटने

निळवंडेतून पाणी सोडण्याची घाई दबावापोटी नको
रुईगव्हाणच्या सरपंचपदी इंदिरा निलेश पवार बिनविरोध
आपण पवार कुटुंबियासोबतच राहणार

नगर –

जिल्हा न्यायलयात वकील व न्यायिक अधिकारी यांच्यात खेळीमेळीचे वातावरण आहे. गेल्या दीड वर्षांपासून असलेले करोनाचे सावट दूर होत आहे. वकील संघटनेने करोना संकट काळात बळी पडलेल्या वकिलांच्या कुटुंबियांना केलेली मदत व न्यायालयात केलेले जागृतीचे कार्य अभिनंदनास्पद आहे. या चांगल्या कामातून संघटनेने आपली चुणूक दाखवून दिली आहे. नवनिर्वाचित अध्यक्षांनी जाहीर केलेल्या योजनांमुळे वकील संघटना किती संवेदनशील आहे हे दिसते, असे प्रतिपादन जिल्हा न्यायाधीश मिलिंद कुर्तडीकर यांनी केले.

          जिल्हा न्यायालयात शहर वकील संघटनेच्या वतीने न्यायाधीश व वकिलांसाठी आयोजित दिवाळी फराळ व बारचे नूतन अध्यक्षांचे स्वागत समारंभात न्यायाधीश मिलिंद कुर्तडीकर बोलत होते. यावेळी जिल्हा सरकारी वकील सतीश पाटील, वकील संघटनेचे मावळते अध्यक्ष अॅड.भूषण बऱ्हाटे, उपाध्यक्ष अॅड.सुहास टोणे, सचिव अॅड.अमोल धोंडे, बारचे नूतन अध्यक्ष अॅड.अनिल सरोदे, नूतन उपाध्यक्ष अॅड.संदीप वांढेकर, सचिव अॅड.स्वाती नगरकर आदींसह सर्व न्यायिक अधिकारी व वकीलवर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते. निवडणूक अधिकारी अॅड. अशोक गुंड यांनी सर्व नूतन पदाधिकाऱ्यांना नियुक्ती पत्रे दिली.

          प्रास्ताविकात अॅड.भूषण बऱ्हाटे म्हणाले, माझा वकील संघटनेच्या अध्यक्षपदाचा संपूर्ण काळ हा करोना काळात गेला आहे. त्यामुळे या संकट काळात भरपूर मदत कार्य संघटनेच्या माध्यमातून करता आले. वकील संघटनेची झालेली निवडणूक खेळीमेळीत झाली. नूतन पदाधीकारींचे स्वागत करताना आनंद होत आहे. दिवाळी निमित्त फराळाचे आयोजन करून सर्वाना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

          नूतन अध्यक्ष अॅड.अनिल सरोदे म्हणाले, सर्व वकील बंधू भगिनींनी मला केलेल्या सहकार्यामुळे मला सेवा करण्याची संधी मिळाली आहे. मावळते अध्यक्ष अॅड.भूषण बऱ्हाटे यांनी खप चांगले काम केले आहे. या कामाचा पायंडा मी कायम राखेल. न्यायलयातील सर्व ज्युनिअर वकिलांना खूप स्ट्रगल करावा लागत आहे. त्यामुळे वकील संघटनेच्या वतीने त्यांचा दोन लाखाचा आरोग्य विमा पॉलीसी काढण्यात येणार आहे.

          नूतन उपध्यक्ष उपाध्यक्ष अॅड.संदीप वांढेकर यांनी संघटनेच्या माध्यमातून निश्चित आदर्शवत काम केले जाईल अशी ग्वाही दिली.

          कार्याक्रमचे सूत्र संचलन अॅड.अमोल धोंडे व अॅड. योगेश गेरंगे यांनी केले. आभार अॅड.सुहास टोणे यांनी मानले. यावेळी अॅड.सतीश पाटील, अॅड.सुभाष भोर, अॅड.शेखर दरंदले यांनी मत व्यक्त केले. नूतन खजिनदार अॅड.अविनाश बुधवंत, सहसचिव अॅड.अमित सुरपुरिया, महिला सहसचिव अॅड.आरती गर्जे, कार्यकारणी सदस्यपदी अॅड.सागर जाधव व विक्रम शिंदे आदींना नियुक्ती पत्र देण्यात आले.

COMMENTS