लॉकडाऊनचा निर्णय उद्यावर

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

लॉकडाऊनचा निर्णय उद्यावर

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत आज संध्याकाळी पाच वाजता राज्याच्या टास्क फोर्सची महत्त्वपूर्ण बैठक झाली.

राज ठाकरेंचे ट्वीट; शिंदेना अभिनंदन आणि सावधानतेचा इशारा.
आरोग्य क्षेत्रातील संशोधनात सातत्य हवे : पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे
आयपीएलवर बेटिंग लावणारे तीन आरोपी अटकेत

मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत आज संध्याकाळी पाच वाजता राज्याच्या टास्क फोर्सची महत्त्वपूर्ण बैठक झाली. मात्र, यामध्ये टास्क फोर्सच्या (Corona Task Force) सदस्यांनी कमीतकमी दोन आठवड्यांचा कडक लॉकडाऊन करण्याचा सल्ला दिला आहे. 

यावर उद्या पुन्हा सकाळी 11 वाजता टास्क फोर्सच्या सदस्यांसोबत मुख्यमंत्री ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit pawar) यांची बैठक होणार असून यामध्ये लॉकडाऊनचा निर्णय घेण्यात येणार असल्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे (Rajesh tope) यांनी स्पष्ट केले आहे. कोरोनाची (Corona) लाट रोखण्यासाठी आणि चेन तोडण्यासाठी कमीतकमी 14 दिवसांच्या लॉकडाऊनची (Lockdown in Maharashtra) गरज असल्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी म्हटले आहे. तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या उपस्थितीत सुरु असलेल्या कोरोना टास्क फोर्सच्या (Corona Task Force) बैठकीत सदस्यांनी देखील 14 दिवसांचा लॉकडाऊन गरजेचा असल्याचे म्हटले होते.

COMMENTS