लसणाचे ‘हे’ फायदे तुम्हाला माहित आहेत का ?

Homeलाईफस्टाईल

लसणाचे ‘हे’ फायदे तुम्हाला माहित आहेत का ?

अनेकांच्या घरात बहुतेक पदार्थांमध्ये लसणाचा वापर नेहमीच केला जातो. कारण, लसूण जितका पदार्थांचा स्वाद वाढवून त्याला चवदार बनवतो, तितकाच तो आपल्या आरोग

आपल्या चॅनेलच्या माध्यमातून जाणून घेऊयात आजचे आपले राशीचक्र
चांगल्या आरोग्यासाठी करा ‘हे’ उपाय
उन्हाचा पारा वाढला, टोप्यांना व गंमच्यांना सर्वाधिक मागणी

अनेकांच्या घरात बहुतेक पदार्थांमध्ये लसणाचा वापर नेहमीच केला जातो. कारण, लसूण जितका पदार्थांचा स्वाद वाढवून त्याला चवदार बनवतो, तितकाच तो आपल्या आरोग्यासाठीदेखील फायदेशीर असतो. परंतु, याशिवाय लसणाचे अनेक फायदे आहेत. सौंदर्यामध्ये देखील लसूण अतिशय फायदेशीर आहे. हे फायदे कोणते आहेत जाणून घ्या…

१. स्ट्रेच मार्क्स दूर होतात:
अनेकांच्या शरीरावर स्ट्रेच मार्क्स असतात. हे स्ट्रेच मार्क्स लठ्ठपणामुळे, आनुवंशिकता (हेरीडिटी) किंवा इतर कारणांमुळे शरीरावर येत असून ते लवकर जात नाही. त्यामुळे तुम्ही जर या स्ट्रेच मार्क्सपासून त्रासले असाल, तर त्यावर लसणाचा उपाय तुम्ही जरुर करू शकता. लसणाचा रस काढून हा रस ऑलिव्ह ऑईलमध्ये मिसळा. हे मिश्रण गरम करा आणि थंड झाल्यानंतर ते स्ट्रेच मार्क्सवर लावून मसाज करा. दररोज हा उपाय केल्याने तुम्हाला नक्कीच फरक जाणवू शकतो.

२. चेहऱ्यावरील मुरूम दूर होतात:
तुमच्या चेहऱ्यावर जर मुरुम असेल, तर ते दूर करण्यासाठी तुम्ही लसणाचा उपयोग करू शकता. लसूण घासून त्याचा रस काढून घ्या आणि हा रस चेहऱ्यावरील मुरुमांवर लावा. ५ मिनिटांनंतर चेहरा धुवून घ्या. या उपायाने तुमच्या चेहऱ्यावर तुम्हाला नक्कीच फरक जाणवेल.

COMMENTS