रोहित पवार – राम शिंदेंना झटका… कार्यकर्त्यांचा शिवसेनेत प्रवेश

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

रोहित पवार – राम शिंदेंना झटका… कार्यकर्त्यांचा शिवसेनेत प्रवेश

प्रतिनिधी : अहमदनगरकर्जत तालुक्यात राष्ट्रवादी आणि भाजपाच्या अनेक कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. तालुकाप्रमुख बळीराम यादव यांच्या पुढाकाराने य

अहमदनगर जिल्ह्यातील 223 गावांतून पूर येण्याची शक्यता…
विठू नामाच्या गजरात धार्मिक व सामाजिक उपक्रम उत्साहात
विज वितरण कंपनीच्या गलथान कारभाराचा खरवंडी कासार ला फटका निम्मे गाव अधांरात

प्रतिनिधी : अहमदनगर
कर्जत तालुक्यात राष्ट्रवादी आणि भाजपाच्या अनेक कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. तालुकाप्रमुख बळीराम यादव यांच्या पुढाकाराने या दोन्ही पक्षातील युवकांनी मंत्री गडाख यांच्या उपस्थितीत शिवसेनेमध्ये प्रवेश केला.

राज्याचे मृदा व जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख हे कर्जत तालुक्यातील शिंदे येथे ‘शिव संवाद घोंगडी बैठकी’साठी आले होते.

यावेळी कर्जत तालुक्यातील सिद्धटेक आणि कुळधरण येथील भाजपा व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अनेक तोरणांनी मंत्री गडाख यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला.

शिवसेनेचे उत्तर नगर जिल्ह्याचे प्रमुख रावसाहेब खेवरे, दक्षिण जिल्हाप्रमुख राजेंद्र दळवी, तालुकाप्रमुख बळीराम अण्णा यादव, माजी तालुकाप्रमुख बिभीषण गायकवाड, कर्जत शहर प्रमुख अक्षय तोरडमल, उपतालुका प्रमुख सुभाष जाधव,

ज्येष्ठ शिवसेना नेते चंद्रकांत घालमे, विभाग प्रमुख पोपट धनवडे, अक्षय घालमे, पौरूष जाधव, सरपंच – उपसरपंच सेवा संस्थांचे पदाधिकारी ग्रामपंचायत सदस्य व इतर उपस्थित होते.

COMMENTS