Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

रेशनिंग घोटाळा प्रकरणातील मुख्य आरोपी रासकरला अटक

मार्केटयार्ड परिसरामध्ये रेशनचा गहू व तांदूळ काळ्याबाजारात विक्रीासाठी साठा करून ठेवल्या प्रकरणी दाखल असलेल्या गुन्ह्यातील मुख्य आरोपी संग्राम रासकर याला कोतवाली पोलिसांनी भिंगार येथे शिताफीने अटक केली.

दिल्लीगेट ते लालटाकी रस्त्यावरील पथदिवे सुरु न केल्यास पालिकेच्या वीज कनेक्शनचा फ्युज घालविणार : गिरीश जाधव
BREAKING: देवेंद्र फडणवीसवर गुन्हा दाखल | LokNews24
क्रांतीकारक राघोजी भांगरे यांच्या विचारांचा आदर्श तरुणांनी घ्यावा ः पिचड

अहमदनगर/प्रतिनिधी- मार्केटयार्ड परिसरामध्ये रेशनचा गहू व तांदूळ काळ्याबाजारात विक्रीासाठी साठा करून ठेवल्या प्रकरणी दाखल असलेल्या गुन्ह्यातील मुख्य आरोपी संग्राम रासकर याला कोतवाली पोलिसांनी भिंगार येथे शिताफीने अटक केली. या प्रकरणातील आणखी एक प्रमुख आरोपी अद्याप फरार आहे. 

    मागील आठवड्यामध्ये कोतवाली पोलिसांनी व पुरवठा विभागाने मार्केटयार्ड परिसरामध्ये रासकरच्या रेशन दुकानांवर व केडगाव येथील गोदामावर छापा टाकून सुमारे 42 लाख रुपयाचा रेशनिंगचा अन्नसाठा पोलिसांनी हस्तगत केला होता. हरियाणा व मध्य प्रदेशातील रेशनिंगचा आणलेला गहु तांदूळ हा सर्रासपणे या ठिकाणी साठवून ठेवल्याचे उघड झाले होते. पोलिसांनी याप्रकरणी दोन वेगवेगळे दोन गुन्हे दाखल केले. या प्रकरणात एकूण आठ जणांना अटक केली आहे. या प्रकरणांमध्ये दोन प्रमुख आरोपी फरार होते. त्यातील संग्राम रासकर याच्या मागावर पोलिस होते. तो अनेक व्यापार्‍यांच्या संपर्कात होता. पोलिसांनी त्याचा शोध घेऊन भिंगार येथे अटक केली. ही कारवाई पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक मनोज कचरे, सुमित गवळी, शाहिद शेख, बंडू भागवत, सोमनाथ राऊत यांच्या पथकाने केली. पोलिस संग्राम रासकरकडे कसून चौकशी करीत आहे. यातील प्रमुख आरोपी व संग्राम रासकरचे वडील आसाराम रासकर अद्याप फरार आहे. पोलिस त्यांचा शोध घेत आहे.

जबाब घेण्यास सुरुवात

रेशनिंगच्या धान्य साठा प्रकरणी अनेकांचे जबाब पोलिसांनी घेण्यास सुरुवात केली आहे. पोलिसांनी संग्राम रासकरकडील मोबाईल जप्त केला आहे. त्याचा तपास करण्यासाठी पोलिसांनी अनेक ठिकाणी तपासणी केली, संग्राम हा नगर शहरामध्ये राहत असून तो येथील व्यापार्‍यांच्या संपर्कात असल्याचे पुरावे पोलिसांच्या हाती लागल्यानंतर पोलिस निरीक्षक राकेश माणगावकर यांनी रासकरच्या शोधासाठी भिंगार येथे पथक पाठवले होते. या पथकाने मोठ्या शिताफीने त्याला भिंगार येथून अटक केली व त्याच्याकडून मोबाईल हस्तगत केला आहे. विशेष म्हणजे हा मोबाईल त्याचा नसून दुसर्‍यांचा मोबाईल वापरून तो व्यापार्‍यांशी व इतरांशी संपर्क करत असल्याचे उघड झाले आहे.

COMMENTS