रेमडीसीवीर…काहींना कोटा सिस्टीमने तर काहींना सहज मिळतात

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

रेमडीसीवीर…काहींना कोटा सिस्टीमने तर काहींना सहज मिळतात

कोरोनावरील उपचार करण्यासाठी प्रभावी ठरणारे रेमडीसीवीर इंजेक्शन काहींना कोटा सिस्टीमने मिळते तर काहींना अगदी सहज मिळतात व हे वास्तव इंडियन मेडिकल असोसिएशनच्या नगर शाखेने मांडले आहे.

प्राचार्य डॉ.बी.एस.यादव यांचा वाढदिवस विविध उपक्रमांनी साजरा
पंकजा मुंडे यांनी शिर्डीत येऊन घेतले साई समाधीचे दर्शन
महिलेवर अत्याचार.. माजी पोलिस निरीक्षकांच्या मुसक्या आवळल्या l पहा LokNews24

अहमदनगर/प्रतिनिधी-कोरोनावरील उपचार करण्यासाठी प्रभावी ठरणारे रेमडीसीवीर इंजेक्शन काहींना कोटा सिस्टीमने मिळते तर काहींना अगदी सहज मिळतात व हे वास्तव इंडियन मेडिकल असोसिएशनच्या नगर शाखेने मांडले आहे. दरम्यान, डॉक्टर्सना रेमडीसीवीर इंजेक्शन मिळत नाही, परंतु तहसील कार्यालय, कलेक्टर ऑफिस व पोलिस सहजपणे इंजेक्शन घेऊन येत असल्याने या प्रकरणी तपास करण्याची गरजही इंडियन मेडिकल असोसिएशनने मांडली आहे. 

 इंडियन मेडिकल असोसिएनच्या नगर शाखेचे अध्यक्ष डॉ. अनिल आठरे व सचिव डॉ. सचिन वहाडणे यांनी रेमडेसीवीर इंजेक्शनबद्दल जनहितार्थ निवेदन जारी केले आहे. यात म्हटले आहे की, सध्या रेमडीसीवीर व टोसिलिझुमॅबचा काळाबाजार खूप वाढला आहे. आमच्या ऐकीव माहितीनुसार रेमडीसीविरची व्हायल व टोसिलिझुमॅब काळ्या बाजारात उपलब्ध असल्याचे समजते. सरकारचे कडक निर्बंध आणि काटेकोर नियम असताना देखील कुठून मिळतात ही इंजेक्शन्स? जिल्ह्यामध्ये येणारा सर्व साठा व पुरवठा हा फक्त जिल्हाधिकारी व अन्न-औषध निरीक्षक यांच्याकडूनच होऊ शकतो. जर सर्व इंजेक्शन सरकारी कोट्यातून फक्त कोविड सेंटर्सलाच मिळत असतील, तर बाहेर कुठल्याही प्रकारचे इंजेक्शन मिळणार नाहीत, हे साहजिकच आहे. पण असे असताना देखील काही व्हीआयपी व व्हीव्हीआयपी लोकांना मात्र ते सहज उपलब्ध होत आहे, तर काहींना कोटा सिस्टीमने मिळत आहे, हे आश्‍चर्यजनक आहे, असे यात म्हटले आहे. रेमडेसीवीर इंजेक्शन हे लायोफिलाईझ्ड पावडर स्वरूपातच येते. त्यामुळे द्रव स्वरूपात असलेले इंजेक्शन नक्कीच बनावट स्वरूपाचे आहे, हे जनतेने लक्षात घ्यावे. काही ठिकाणी तर मूळ औषधांऐवजी त्यामध्ये दुसरेच काहीतरी (बहुधा पाणी किंवा स्टेरॉईड) भरून विकण्याचे उद्योग होऊ शकतात. अशाच प्रकारचे एक रॅकेट देखील पकडले असल्याचे निदर्शनास आले आहे. रेमडीसीवीरऐवजी जर दुसरेच काही औषध भरलेले असल्यास पेशंटच्या जीवितास धोका देखील होऊ शकतो. तसेच यापासून रुग्णाला फायदा होण्याची शक्यता तर नाहीच, उलट नुकसानच होण्याची शक्यता अधिक आहे, असेही स्पष्टपणे नमूद करण्यात आले आहे.

बिल नसलेले इंजेक्शन नाकारणार

अधिकृत बिलाशिवाय आणलेले इंजेक्शन्स पेशंटला देण्याचा धोका हॉस्पिटल्स पत्करू शकत नाहीत म्हणून इंजेक्शनचे बिल असल्याशिवाय कोणत्याही कोविड सेंटरने बाहेरून आणलेले (विदाऊट बिल) इंजेक्शन अ‍ॅक्सेप्ट करु नये, असा अहमदनगर मेडिकल असोसिएशनने निर्णय घेतला आहे. महाराष्ट्रातल्या सर्वच कोव्हीड हॉस्पिटल्सनी अशा प्रकारचे पाऊल उचलल्यास रेमडीसीवीरच्या काळ्या बाजाराला नक्कीच चाप बसू शकतो. तसेच नुकत्याच आयसीएमआरने दिलेल्या निष्कर्षाप्रमाणे रेमडेसीवीर इंजेक्शन हे फारसे परिणामकारक नाही व ते मोजक्या पेशंटमध्ये संसर्गाच्या 9 दिवसांच्या आत दिल्यास थोड्या प्रमाणात उपयोगी ठरते, असे स्पष्ट करून, तसेच आयएमए सभासद असलेले डॉक्टर कोणत्याही रुग्णाच्या नातेवाईकांना बाहेरून इंजेक्शन आणण्यासाठी प्रिस्क्रिप्शन देत नाहीत, असेही यात आवर्जून स्पष्ट करण्यात आले आहे.

COMMENTS