कोपरगाव येथील महिलेकडून रेमडीसीवर तीन इंजेक्शन चे २२ हजार रुपये प्रमाणे ६६ घेऊन काळा बाजारात विक्री केल्या प्रकरणी कोपरगाव शहर पोलिसांनी गुन्हा दाखल करावा अशी नागरिकांमधून मागणी होत आहे.
कोपरगाव शहर प्रतिनिधी : कोपरगाव येथील महिलेकडून रेमडीसीवर तीन इंजेक्शन चे २२ हजार रुपये प्रमाणे ६६ घेऊन काळा बाजारात विक्री केल्या प्रकरणी कोपरगाव शहर पोलिसांनी गुन्हा दाखल करावा अशी नागरिकांमधून मागणी होत आहे.
नुकतेच कोपरगाव नगर पालिकेचे लोकनियुक्त नगराध्यक्ष साहेब यांनी कोपरगाव शहरातील मेडिकल मध्ये रेमडीसीवर इंजेक्शन २२ हजार रुपयात विकले असून पेशंट च्या नातेवाईकांनी तीन इंजेक्शन चे ६६ हजार रुपयात खरेदी केले असल्याचा खुलासा केला मात्र एका बाजूला एवढा मोठा धक्का दायक प्रकार समोर येऊन देखील त्या बाबत कोणतीही तक्रार दाखल झाली नाही उलट हे प्रकरण दडपून टाकण्यात आले असे दिसत आहे नगराध्यक्ष हे शहरातील जबाबदार घटक व शहराचे प्रथम नागरिक म्हणून ही तक्रार करत असून कोपरगाव पोलिसांनी या बाबत स्वतः हुन गुन्हा दाखल करणे आवश्यक आहे प्रत्येक मेडिकल मध्ये किती इंजेक्शन दिले गेले याचा तपशील वैद्यकीय विभागाकडे उपलब्ध आहे त्याच प्रमाणे प्रत्येक मेडिकल मध्ये विक्री केलेल्या औषधांची त्यांच्या कडे नोंद आहे त्यामुळे पोलिसांनी गुन्हा दाखल केल्यास खूप मोठे रॅकेट उघड होऊ शकते त्यामुळे नगराध्यक्ष साहेब यांचा खुलासा हा प्रथम खबर म्हणून नोंदवून घेऊन पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास करावा अशी मागणी होत आहे या पूर्वी देखील सदर इंजेक्शनची अशीच चढ्या भावाने विक्री झाली म्हणून तक्रार दाखल झाली छापा पडला पण पुढे काय झाले हे गुलदस्त्यात राहील त्यामुळे याबाबत पोलिसांनी ठोस भूमिका घेऊन गुन्हा दाखल करून तपास करावा
COMMENTS