रॅपिड अँटिजन किट तातडीने उपलब्ध करुन द्या :स्नेहलताताई कोल्हे

Homeमहाराष्ट्रअहमदनगर

रॅपिड अँटिजन किट तातडीने उपलब्ध करुन द्या :स्नेहलताताई कोल्हे

कोरोना सारख्या वैश्विक महामारीमुळे जगासह, देश ठप्प झाला असुन राज्यातील जनजीवनही पूर्णपणे विस्कळीत झालेले आहे. कोपरगाव मतदारसंघात या दुसर्या लाटेत रुग्णांची संख्या मोठयाप्रमाणात वाढलेली आहे.

BREAKING: महाराष्ट्र सरकार ने जाहीर केलं Weekend Lockdown | What Is Weekend Lockdown? | LokNews24
एस.जी. विद्यालयाचे संस्थापक ठोळे यांची जयंती उत्साहात
कोपरगावमध्ये शिवसेना सभासद नोंदणी अभियान उत्साहात

कोपरगाव शहर प्रतिनिधी – कोरोना सारख्या वैश्विक महामारीमुळे जगासह, देश ठप्प झाला असुन राज्यातील जनजीवनही पूर्णपणे विस्कळीत झालेले आहे. कोपरगाव मतदारसंघात या दुसर्या लाटेत रुग्णांची संख्या मोठयाप्रमाणात वाढलेली आहे. याच परिस्थितीत रूग्णांना आॅक्सीजन, रेमडिसिव्हर इंजेक्शन तसेच बेड देखील उपलब्ध होत नाही, यापाठोपाठ आत्ता रॅपिड अँटिजन किट गेली तीन दिवसांपासुन उपलब्ध नाही त्याचाही तुटवडा निर्माण झाल्याने शहर व ग्रामीण भागातील तपासणीसाठी आलेल्या नागरिकांना विनातपासणी माघारी जावे लागत आहेत, त्यात काही नागरिकांना लक्षणे असतांना देखील आपण सुरक्षीत असल्याचे गृहीत धरुन नागरिक बिनधास्त वावरत आहे रुग्ण संख्येत वाढू नये याकरिता रॅपीड अॅटिजन किट तातडीने उपलब्ध व्हावे यासाठी पालकमंत्री नामदार हसन मुश्रीफ यांच्याकडे कोपरगाव विधानसभा मतदारसंघाच्या माजी आमदार, भारतीय जनता पार्टीच्या प्रदेशसचिव सौ. स्नेहलता बिपीनदादा कोल्हे यांनी लेखीपत्राव्दारे मागणी केली आहे.
कोपरगांव मतदारसंघात अशीच परिस्थिती राहते की काय ? असे देखील आत्ता वाटायला लागले आहेत. सरकारने बंधनकारक केलेल्या चाचण्यांमुळे आता टेस्टींग सेंटर वर रांगांच रांगा दिसत आहेत त्यातच कोरोना टेस्ट किटचा ही तुटवडा निर्माण झाल्याने नागरिकांना माघारी जावे लागत असल्याने आपण कोरोना बाधित रुग्ण आहेत किंवा नाही हे कळणार कसे ?. नागरिकांचे वेळेतच तपासणी होणे देखील गरजेचे आहे. राज्य सरकार ने कोरोना कालावधीत योग्य ते नियोजन न केल्याने महाराष्ट्रात ही गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. वैद्यकीय विभागाला कोरोना संदर्भात लागणारे साहित्य, औषधांचे वेळेतच नियोजन राज्य सरकारने केले असते ही परिस्थिती निर्माण झाली नसती. तुटवडा झाल्यावर जागी होणारे हे सरकार जनतेचे काय कामाचे ?. कामाला जाण्यासाठी, बाहेरगांवी प्रवास करणार्यांची संख्या जास्त असल्याने तपासणी केंद्रावर गर्दीचे प्रमाण मोठे असल्याने प्रशासनावर ताण पडत आहे. सरकारने आता अॅटीजेन चाचणीला परवानगी दिली तरी मुळातच चाचण्यांचा हा अट्टाहास का ? असा सवाल आता नागरिकांमधुन विचारला जात आहे. आता सरकारने नवा आदेश काढत आरटीपीसीआर ऐवजी अॅंटीजेन चाचण्या केलेल्याही चालतील असं सांगितलं आहे मात्र या गरजु – लक्षण असणार्या नागरिकांना प्रथम चाचणीला प्राधान्य मिळेल असे धोरण का ठरवले जात नाही. कोरोनावर नियंत्रण आणण्यासाठी नागरिकांनीच आपली व आपल्या कुटुंबातील सदस्यांची काळजी घेणे गरजेचे आहे. प्रशासनाने घालुन दिलेल्या नियमांचे पालन करावे. कोरोना कालावधीत राज्य सरकार नियोजन करण्यात अपयशी ठरल्यामुळेच स्थानिक पातळीवरील वैद्यकीय अधिकारी, महसुल , नगपरिषद, पोलीस अधिकारी राञ न दिवस एक करुन आपआपल्या पातळीवर नियोजन करत कोरोनाशी लढाई करुन नागरिकांना संरक्षण देण्याचे काम करत आहे. नागरिकांची देखील प्रशासनाला मदत करण्याची मोठी जवाबदारी असुन प्रशासनाला जास्तीत जास्त सहकार्य करावे असे आवाहन सौ. कोल्हे यांनी केले आहे.

COMMENTS