रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांना  तीन वर्षांची मुदतवाढ

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांना तीन वर्षांची मुदतवाढ

नवी दिल्ली: रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांच्या कार्यकाळाला तीन वर्षांची मुदतवाढ देण्यात आलीय. दास यांचा कार्यकाळ 10 डिसेंबर 2021 पर्यंत ह

घर घर लंगर सेवा करणार कष्टकरी मजुरांची दिवाळी गोड
पहाटेच्या सुमारास तीन देशांना भूंकपाचे धक्के!
कुपवाडामध्ये तीन दहशतवाद्यांचा खात्मा

नवी दिल्ली: रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांच्या कार्यकाळाला तीन वर्षांची मुदतवाढ देण्यात आलीय. दास यांचा कार्यकाळ 10 डिसेंबर 2021 पर्यंत होता त्याला मंत्रिमंडळाच्या नियुक्ती समितीने 3 वर्षांची मुदवाढ दिलीय. यासंदर्भात गुरुवारी रात्री पुनर्नियुक्ती आदेश जारी करण्यात आलेत.
भारतीय रिझर्व्ह बँकेचे 25 वे गव्हर्नर असलेल्या दास यांनी 11 डिसेंबर 2018 रोजी पदभार ग्रहण केला होता. ते आता पुढील तीन वर्षे किंवा पुढील आदेशापर्यंत पदावर राहणार आहेत. मंत्रिमंडळाच्या नियुक्ती समितीने 10 डिसेंबर 2021 नंतर किंवा पुढील आदेश येईपर्यंत तीन वर्षांच्या कालावधीसाठी रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर म्हणून शक्तीकांत दास यांची पुनर्नियुक्ती करण्यास मान्यता दिल्याचे अधिकृत पत्रकात सांगण्यात आले आहे. यापूर्वी दास वित्त मंत्रालयात आर्थिक व्यवहार विभागाचे सचिव होते. त्यांची 11 डिसेंबर 2018 रोजी तीन वर्षांच्या कालावधीसाठी रिझर्व्ह बँकेचे प्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आली होती.

COMMENTS