रिक्षा व टॅंक्सीचालकांना शासनाने अनुदान दयावे : कोल्हे

Homeमहाराष्ट्रअहमदनगर

रिक्षा व टॅंक्सीचालकांना शासनाने अनुदान दयावे : कोल्हे

राज्यात कोरोनाची लाट वाढली असुन यामुळे राज्यभरात लाॅकडाउनची परिस्थिती आहे. त्यामुळे जनजीवन संपुर्णपणे विस्कळीत झाले असुन बाजारपेठा ठप्प आहे. त्यामुळे दळणवळणही बंद आहे.

राष्ट्रवादी पक्षात युवकांना सन्मानासह काम करण्याची संधी -आ. संग्राम जगताप
गटनोंदणी फुटली …मुंबईचा हस्तक्षेप झाला सुरू
कोपरगावला आठवडे बाजारात तरुणाचा लोखंडी रॉड ने व दगडाने ठेचून हत्या

कोपरगाव शहर प्रतिनिधी-  राज्यात कोरोनाची लाट वाढली असुन यामुळे राज्यभरात लाॅकडाउनची परिस्थिती आहे. त्यामुळे जनजीवन संपुर्णपणे विस्कळीत झाले असुन बाजारपेठा ठप्प आहे. त्यामुळे दळणवळणही बंद आहे. यातच असंख्य वाहनचालकांवर उपासमारीची वेळ आली आहे. याकरीता शासनाने त्यांच्या कुटूंबाला मदत करावी, याकरीता रिक्षाचालकांसह विविध वाहनचालकांना पाच हजार रूपयाचे अनुदान दयावे, अशी मागणी भारतीय जनता पार्टीच्या प्रदेश सचिव, माजी आमदार सौ स्नेहलताताई बिपीनदादा कोल्हे यांनी राज्याचे मुख्यमंत्री ना.उध्दवजी ठाकरे यांचेकडे केली आहे. राज्यामध्ये सुरू असलेल्या लाॅकडाउनमुळे बाजारपेठा बंद असल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे. यामुळे दळणवळण बंद असल्याने खाजगी वहानेही बंद आहे. त्यामध्ये कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी काम करणा-या अनेक वाहन चालकांचे कामही बंद आहे. यामुळे अनेक कुटूंबांना उपासमारीचा सामना करावा लागत आहे. रिक्षाचालक, भाडोत्री वाहने,टॅक्सीचालक अशा विविध प्रकारचे वाहनधारक यांचा समावेश आहे. वाहने खरेदी करण्यासाठी अनेकांनी बॅंकेकडून कर्ज घेतलेली आहे. कर्जापोटीचे हप्ते तर भरणे मुश्किल झालेले आहे. परंतु यासाठी आकारण्यात येणारे व्याजही भरणे शक्य नाही. या शिवाय कुटूंब कसे चालवायचे, असा प्रश्न त्यांचे पुढे उभा राहीलेला आहे. त्यामुळे शासनाने राज्यभरातील रिक्षाचालक, टॅक्सीचालक इतर तत्सम वाहनचालकांना किमान पाच हजाराचे अनुदान तातडीने देण्यात यावे, अशी मागणी सौ कोल्हे यांनी केली आहे.

COMMENTS