अहमदनगर/प्रतिनिधी- नगर शहरातील ऑटो रिक्षा चालकांसाठी शहर वाहतूक शाखेचे नवीन आदेश अंमलात आले आहेत. रिक्षा चालकाची माहिती असलेले स्टिकर लावण्याचे आदेश
अहमदनगर/प्रतिनिधी- नगर शहरातील ऑटो रिक्षा चालकांसाठी शहर वाहतूक शाखेचे नवीन आदेश अंमलात आले आहेत. रिक्षा चालकाची माहिती असलेले स्टिकर लावण्याचे आदेश वाहतूक शाखेचे पोलिस निरीक्षक राजेंद्र भोसले यांनी दिले असून, त्याची अंमलबजावणीही सुरू झाली आहे.
ऑटो रिक्षामध्ये कोणतेही अनुचित प्रकार घडू नये या हेतूने तसेच ऑटोरिक्षाची शहरामध्ये संख्या वाढत असल्याने रिक्षाचालकाची ओळख व माहिती असणारे स्टिकर काचेवरती लावण्याची मोहीम शहर वाहतूक शाखेचे पोलिस निरीक्षक भोसले यांनी गुरुवारपासून सुरू केली. यावेळी शाहीद खान, तौसिफ शेख, कय्युम सय्यद, अमजद मोमीन, जहीर सय्यद, अजय कानडे, नितिन ढवळे, राजु मकासरे, बेनी अंकल, वाहतूक शाखेचे पाटोळे, सय्यद, गवळी, बोडखे, सोनवणे, साळवे आदी उपस्थित होते. नगर शहरामध्ये रिक्षा चालक हा बाहेरचा नसून इथलाच असल्याचे समजेल व प्रवाशांना आणि पोलिसांना देखील कुठल्याही प्रकारचा त्रास होणार नाही व त्या माहितीच्या आधारे पोलिसांना तपासण्यासाठी देखील अडचण येणार नाही तसेच माहिती लावणारा रिक्षा चालक हा अधिकृत परवानाधारक असल्याचे समजता येणार आहे, असे यावेळी सांगण्यात आले. पुणे-मुंबई येथे घडलेल्या घटनेसंदर्भात नगर शहर वाहतूक शाखेच्यावतीने हा उपक्रम हाती घेण्यात आला आहे. यातून रिक्षाचालकांना देखील शिस्त लागेल व कोण कुठल्याही प्रकारच्या अनधिकृत थांब्यावर थांबणार नाही, असा विश्वास पोलीस निरीक्षक भोसले यांनी व्यक्त केला.
COMMENTS