राहाता तालुका भाजप ओबीसी कार्यकारणी जाहीर

Homeताज्या बातम्याअहमदनगर

राहाता तालुका भाजप ओबीसी कार्यकारणी जाहीर

शिर्डी | दि. ४ प्रतिनिधी : भारतीय जनता पार्टी ओबीसी मोर्चा राहाता तालुक्याची कार्यकारणी भाजपचे आ. राधाकृष्ण विखे पाटील, खा. डॉ. सुजय विखे पाटी

डॉ. सुनील शिंदे यांच्या ‘अगस्त्यकांता लोपामुद्रा’ या गौरवस्तोत्राचे प्रकाशन
महानगरपालिकेवर काँग्रेसचा भव्य आसूड मोर्चा
समृद्धी महामार्गामुळे देवेंद्र फडणवीसांचे स्वप्न पूर्ण – स्नेहलता कोल्हे

शिर्डी | दि. ४ प्रतिनिधी :

भारतीय जनता पार्टी ओबीसी मोर्चा राहाता तालुक्याची कार्यकारणी भाजपचे आ. राधाकृष्ण विखे पाटील, खा. डॉ. सुजय विखे पाटील तसेच प्रदेशाध्यक्ष योगेश टिळेकर यांच्या मार्गदर्शनाखाली भाजपा उत्तर नगर जिल्हाध्यक्ष राजेंद्र गोंदकर यांच्या प्रमुख उपस्थितीत जाहीर करण्यात आली असून प्रातिनिधिक स्वरूपात निवड केलेल्या युवा ओबीसी तालुका प्रमुखपदी जितेंद्र माळवदे तसेच तालुका प्रसिद्धी प्रमुख संजय महाजन यांचा जिल्हाध्यक्ष राजेंद्र गोंदकर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

दरम्यान राहाता तालुका कार्यकारणीसाठी ओबीसी मोर्चाचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब गाडेकर, ओबीसी मोर्चा प्रभारी अशोक यांचेही मार्गदर्शन लाभले आहे. कार्यकारणीत सदर तालुक्यातील प्रत्येक भागातील समाज घटकांना संधी देऊन भाजपा पक्ष संघटना सक्षम करणे हा उद्देश समोर ठेऊन विविध क्षेत्रातील मान्यवरांना कार्यकारणीत जवाबदारी देण्यात आली.

सदर प्रसंगी प्रतिनिधिक स्वरूपात युवा ओबीसी मोर्चा तालुका प्रमुखपदी जितेंद्र माळवदे यांची तर तालुका प्रसिद्धी प्रमुखपदी संजय महाजन यांची निवड करण्यात आली असून राजेंद्र गोंदकर व अशोक पवार, स्वानंद रासने यांच्या हस्ते शाल नियुक्तीपत्र देऊन भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या. यावेळी राजेंद्र शर्मा, वैभव शिंदे उपस्थित होते.

या कार्यक्रमाला शिवाजी गोंदकर, नितीन कापसे, सचिन शिंदे, किरण बोऱ्हाडे, योगेश गोंदकर, सुनिल लोंढे, सचिन भैरवकर आदी मान्यवरांचे सहकार्य लाभले. भाजपा ओबीसी मोर्चा पक्ष संघटनेत अनेक इच्छुकांना भविष्यात संधी देण्यात येणार असून निवड करण्यात आलेल्या पदाधिकाऱ्यांना आ. राधाकृष्ण विखे पाटील व खा. डॉ. सुजय विखे पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत नियुक्तीपत्र दिले जाणार आहे.

भारतीय जनता पार्टी ओबीसी मोर्चा तालुका कार्यकारणी पुढीलप्रमाणे असून तालुकाध्यक्ष राहाता स्वानंद रासने, सरचिटणीस भिमराज मुर्तडक, किरण शहाणे योगेश गाडेकर, उपाध्यक्ष अँड अमोल बिडवे, सुनिल राहाणे, रंजित कडलग, योगेश शिंदे, प्रशांत मुंडलिक, सुभाष वऱ्हाडे, योगेश घाटघर, संजय उपाध्ये, गोरक्षनाथ पवार, सुभाष गाडेकर, विजय गाडेकर, भगवान गाडेकर, चिटणीस सचिन पळसे, सचिन नागरे, बद्रीनाथ वाघचौरे, संतोष गाडेकर, राहूल जंगम, विजय राहाते, अजय गाडेकर, अक्षय जंगम, संतोष बोऱ्हाडे, संजय बिडवे, कोषाध्यक्ष योगेश पवार, राहूल सोनवणे, अमोल गाडेकर, सोमनाथ शिंदे, संपर्क प्रमुख वैभव शिंदे, कैलास खोंडे, भारत वाकचौरे, विलास रसाळ, युवा ओबीसी मोर्चा तालुका मंडल प्रमुख जितेंद्र माळवदे, सह. प्रमुख स्वप्नील हराळे, नितीन क्षीरसागर, मयूर कोळपकर, अजय व्यवहारे, संतोष ढवळे, दत्तात्रय सोनटक्के प्रसिद्धी प्रमुख साईप्रसाद कुंभकर्ण, सोशल मीडिया संयोजक शरद शिंदे, सह संयोजक विजय कोळपकर, नितीन वाके, कार्यकारणी सदस्य विजय कासार, श्रीधर बेंद्रे, भाऊसाहेब आहेर, राहूल माळवदे, दिगंबर कदम, गणेश शिंदे, महेश आहेर, सुनिल भुजाडे आदींची निवड करण्यात आली आहे.

COMMENTS