मोदी सरकारच्या 7 व्या वर्षपूर्ती निमित्त महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीसांनी केंद्र सरकार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींचे कौतुक केले.
मुंबई : मोदी सरकारच्या 7 व्या वर्षपूर्ती निमित्त महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीसांनी केंद्र सरकार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींचे कौतुक केले. ट्वीटर द्वारे देवेंद्र फडणवीस म्हणाले, “सलाम…सात वर्षांच्या…सेवेला… भारतमातेची सेवा करीत आपले राष्ट्र अधिक बलशाली करण्याचाच सातत्याने प्रयत्न मा. नरेंद्र मोदीजी करीत आहेत.
आत्मनिर्भर ते आत्मविश्वास! पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या ७ वर्षाच्या सेवाकाळात ‘गरीब कल्याण’ हाच महत्वाचा मंत्र राहिला. सुप्रशासन, विकास, सुधारणा एका नव्या उंचीवर पोहोचले. असा आहे हा प्रवास. आज या संकटसमयी देशाला अतिशय सशक्त नेतृत्व प्रदान करीत असल्याबद्दल आम्ही त्यांचे आभार मानतो. त्यांच्या दृढनिश्चयी भूमिकेमुळे नवभारताच्या निर्मितीच्या या प्रवासाने आज संपूर्ण जगाचे लक्ष वेधून घेतले आहे. कोरोनाच्या कालखंडात मा. नरेंद्र मोदीजी हे समाजातील प्रत्येक घटकासोबत ठामपणे उभे राहिले. आज जेव्हा मा. नरेंद्र मोदीजी यांच्या सरकारला ७ वर्ष पूर्ण होत आहेत, तेव्हा आम्ही सारे भाजपा कार्यकर्ते ‘सेवा हेच संघटन’ हे ब्रीद घेऊन स्वतःला पुन्हा एकदा संकल्पबद्ध करीत आहोत.
COMMENTS