राष्ट्रवादीचे आमदार अण्णा बनसोडेंच्या मुलाला अटक

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

राष्ट्रवादीचे आमदार अण्णा बनसोडेंच्या मुलाला अटक

राष्ट्रवादी काँग्रेसचे पिंपरीतील आमदार अण्णा बनेसोडे यांचा मुलगा सिद्धार्थ बनसोडे याच्यासह चार जणांना रत्नागिरी येथून अटक करण्यात आली आहे.

अंत्ययात्रेत वाजला डीजे, खांदेकरीही नाचले. धक्कादायक व्हिडिओ व्हायरल
संगणक कर्मचार्‍यांना कनिष्ठ लिपिक पदाची लॉटरी
जम्मू-काश्मीरमध्ये 5 जवानांना वीरमरण

पुणे/प्रतिनिधीः राष्ट्रवादी काँग्रेसचे पिंपरीतील आमदार अण्णा बनेसोडे यांचा मुलगा सिद्धार्थ बनसोडे याच्यासह चार जणांना रत्नागिरी येथून अटक करण्यात आली आहे. आ. बनसोडे यांच्या पीएलादेखील पोलिसांनी अटक केल्याचे सांगण्यात येत आहे. खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी सिद्धार्थ याच्या विररोधात निगडी पोलिस ठाण्यात दोन गुन्हे दाखल आहेत. पिंपरी-चिंचवड पोलिसांनी ही कारवाई केली. 

आ. बनसोडे यांच्या दिशेने गोळीबार केल्याप्रकरणी पिंपरी पोलिस ठाण्यात 13 मे रोजी गुन्हा दाखल करण्यात आला होता. काळभोरनगर, चिंचवड येथे 12 मे रोजी ही घटना घडली होती. तसेच निगडी पोलिस ठाण्यात दोन गुन्हे दाखल करण्यात आले होते. बेकायदा जमाव जमवून मारहाण करून खुनाचा प्रयत्न करणे तसेच अपहरण करून खुनाचा प्रयत्न करणे, असे दोन वेगवेगळे गुन्हे निगडी पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आले होते. त्या गुन्ह्यांमध्ये सिद्धार्थ अण्णा बनसोडे आणि इतर काही आरोपी फरार होते. पोलिस त्यांच्या मागावर होते; मात्र दोन आठवड्यांपासून ते पोलिसांना गुंगारा देत होते.

पहिली घटना आकुर्डी येथील एजी एनव्हायरो इन्फ्रा प्रा. लि. यांच्या कार्यालयात 11 मे रोजी घडली होती. याप्रकरणी स्वाती सचिन कदम (वय 39, रा. गंगानगर, फुरसुंगी) यांनी निगडी पोलिस ठाण्यात 12 मे रोजी फिर्याद दिली. त्यानुसार सिद्धार्थ बनसोडे, बनसोडे यांचे पीए व इतर आठ जण (पूर्ण नाव व पत्ता माहीत नाही) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. कदम या एजी एनव्हायरो इन्फ्रा प्रायव्हेट लि. या कंपनीत नोकरीला आहेत. कंपनीच्या आकुर्डी येथील कार्यालयात आरोपी आले. त्यांनी धनराज बोडसे व अमोल कुचेकर यांना मारहाण केली. कंपनीचे आयटी एक्झीक्यूटीव विनोद रेड्डी यांना डोक्यावर लोखंडी टॉमीसारख्या शस्त्राने मारहाण करून जिवे ठार मारण्याचा प्रयत्न केला. तसेच कामगार गोकर्ण चव्हाण यांना ढकलून जखमी केले. त्यानंतर ऑफिस बंद करण्यास सांगून कदम व तानाजी पवार यांना शिवीगाळ करून जीवे ठार मारण्याची धमकी देऊन निघून गेले.

दुसर्‍या घटनेत तानाजी भगवान पवार (वय 39, रा. मोशी प्राधिकरण) यांनी पिंपरी पोलिस ठाण्यात 13 मे रोजी फिर्याद दिली. सिद्धार्थ अण्णा बनसोडे, सावंतकुमार, लांडगे, सोन्या, साजिद, सुलतान (पूर्ण नाव व पत्ता माहीत नाही) तसेच इतर 10 ते 15 इसम यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. आ. बनसोडे आणि फिर्यादी यांचे फोनवरून संभाषण झाले. त्या वेळी पवार हे आमदारांना उलटे बोलले, असा आरोपींचा समज झाला. पवार हे 12 मे रोजी सकाळी अकराच्या सुमारास त्यांच्या आकुर्डी येथील कार्यालयात असताना आ. बनसोडे यांच्या दोन साथीदारांनी जीवे ठार मारण्याच्या उद्देशाने त्यांचे अपहरण करून काळभोर नगर, चिंचवड येथे नेले. तेथे आमदारांचा मुलगा सिद्धार्थ बनसोडे याच्यासह इतर आरोपींनी पवार यांना मारहाण करून शिवीगाळ केली. सिद्धार्थने लोखंडी चॉपरने डोक्यात मारून जीवे ठार माण्याचा प्रयत्न केला.

COMMENTS