राष्ट्रवादीचा सरपंच चंदन तस्करांच्या टोळीत सक्रिय… पोलिसांची कारवाई

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

राष्ट्रवादीचा सरपंच चंदन तस्करांच्या टोळीत सक्रिय… पोलिसांची कारवाई

देवळाली प्रवरा / प्रतिनिधी,            राहुरी येथे चंदन तस्करी करणाऱ्या दोघां जणांच्या राहुर

नगर शहराचे ग्रामदैवत श्री विशाल गणेश मंदिरात कोविड नियमांचे पालन करुन होणार ‘श्री’ची प्राणप्रतिष्ठा – अ‍ॅड.अभय आगरकर
श्री स्वामी समर्थ महाराज चरित्र || LokNews24
रोहित पवार – राम शिंदेंना झटका… कार्यकर्त्यांचा शिवसेनेत प्रवेश

देवळाली प्रवरा / प्रतिनिधी, 

          राहुरी येथे चंदन तस्करी करणाऱ्या दोघां जणांच्या राहुरी पोलिसांनी मुसक्या आवळून ताब्यात घेतले. मात्र या चंदन तस्करीमध्ये आणखी दोघांची नावे समोर आली असून एक राष्ट्रवादी पक्षाचा सरपंच असल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे आता पोलिस प्रशासनाची कारवाई करतांना नाकीनळ येत आहे.

        राहुरी येथे चंदनाची तस्करी करणाऱ्या दोघां जणांना राहुरी पोलिस पथकाने सहा किलो चंदन व मोटारसायकल असा सुमारे १ लाख ९ हजार रुपयांच्या मुद्देमालासह ताब्यात घेऊन जेरबंद केले होते. ही घटना राहुरी तालुक्यातील वांबोरी परिसरात दिनांक ६ सप्टेंबर रोजी घडली होती.

        दिनांक ६ सप्टेंबर रोजी सायंकाळी साडेपाच वाजे दरम्यान या घटनेतील चंदन चोर अमर पवार व विजय पवार हे राहुरी तालुक्यातील वांबोरी परिसरात प्रसाद साखर कारखान्या पासून कात्रडकडे जाणार आहेत. अशी खबर राहुरी पोलिस ठाण्यातील पोलिस उप निरीक्षक तुषार धाकराव यांना गुप्त खबऱ्या कडून मिळाली. त्यांनी ताबडतोब सदर घटनेची माहिती पोलिस निरीक्षक राजेंद्र इंगळे यांना दिली. त्यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उप निरीक्षक तुषार धाकराव, हवालदार दिनकर चव्हाण, संतोषकुमार राठोड, पोलिस नाईक आजिनाथ पालवे, रोहित पालवे आदि पोलिस पथकाने कात्रडकडे जाणाऱ्या रस्त्यावर सापळा लावला. काही वेळातच आरोपी अमर पवार व विजय पवार हे दोघे एका मोटरसायकलवर आले. पोलिस पथकाने ताबडतोब त्यांच्या मुसक्या आवळून ताब्यात घेतले. त्यावेळी त्यांच्याकडे सहा किलो वजनाची चंदनाचे लाकडे आढळून आली. ते चंदन विक्री करण्यासाठी चालवली होती. 

       या कारवाईत पोलिस पथकाने ६ किलो २०० ग्रँम वजनाचे ५८ हजार ९०० रूपये किंमतीचे चंदन तसेच एक ५० हजार रूपये किंमतीची मोटारसायकल असा एकूण १ लाख ८ हजार ९०० रूपयांचा मुद्देमाल हस्तगत केला.  आरोपी अमर नामदेव पवार वय ३० वर्षे राहणार आडवी पेठ, प्रगती शाळेसमोर राहुरी, विजय रामदास पवार वय ३८ वर्षे राहणार एकलव्य वसाहत, राहुरी या दोघांना गजाआड केले होते. त्यांना न्यायालयात हजर केले असता पोलिस कोठडी देण्यात आली होती. या घटनेचा पुढील तपास पोलिस निरीक्षक राजेंद्र इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उप निरीक्षक तुषार धाकराव हे करीत आहेत. पोलिस तपासा दरम्यान या चंदन तस्करीमध्ये बाबासाहेब दशरथ शिंदे राहणार काञड ता. राहुरी. तसेच राहुरी खुर्द येथील मल्हारी नामक तरूण या दोघांचा समावेश असल्याची कबूली पकडलेल्या आरोपींनी दिली. या घटनेतील बाबासाहेब दशरथ शिंदे हा कात्रड ग्रामपंचायतचा विद्यमान सरपंच आहे. त्याच्यावर यापूर्वी अनेक गुन्हे दाखल आहेत. सत्ताधारी पक्षाचा सरपंच असल्याने या प्रकरणा बाबत पोलिस प्रशासनावर दबाव येत असल्याचे समजते. 

       राहुरी येथील पोलिस प्रशासन राजकिय दबावाला झिडकारून त्या सरपंचला अटक करणार का? कि, त्याला अटकपूर्व जामीन घेण्याची संधी देणार. याची तालुक्यात मोठी चर्चा सुरू आहे. सध्या तरी पोलिस डायरीमध्ये सरपंच बाबासाहेब शिंदे व मल्हारी नामक तरूण पसार असल्याचे दाखविण्यात आले आहे.

COMMENTS