राणेंच्या अटकेचे आदेश काढणारे पोलीस अधिकारी गेले राज ठाकरेंच्या भेटीला… म्हणाले…

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

राणेंच्या अटकेचे आदेश काढणारे पोलीस अधिकारी गेले राज ठाकरेंच्या भेटीला… म्हणाले…

प्रतिनिधी : नाशिक नाशिकच्या महापालिका निवडणुकीची मोर्चेबांधणी करण्यासाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे नाशिकला आले आहेत. दरम्यान, त्यांच्या स्वागत

महानगरपालिकेच्या कार्यालयात भरवले खड्ड्यांचे प्रदर्शन…
दुष्काळग्रस्त गावांना पिण्याच्या पाण्याचे टँकर चालू करा ः मनसे
मनसेने सत्तेसाठी कधीही शिवसेनेसारखी लाचारी पत्करली नाही… आमदार राजू पाटील

प्रतिनिधी : नाशिक

नाशिकच्या महापालिका निवडणुकीची मोर्चेबांधणी करण्यासाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे नाशिकला आले आहेत. दरम्यान, त्यांच्या स्वागतासाठी लावण्यात आलेले होर्डिंग्स काल पोलीस आणि महापालिका प्रशासनाने काढल्याने मनसैनिक आणि प्रशासनामध्ये वादावादी झाली होती, 

त्यानंतर आज खुद्द नाशिकचे पोलीस आयुक्त दीपक पांडेय यांनी आज राज ठाकरेंची भेट घेऊन चर्चा केली. राज ठाकरे ज्या हॉटेलमध्ये थांबले आहेत, 

त्या हॉटेलमध्ये जाऊन पोलीस आयुक्त दीपक पांडेय यांनी त्यांच्याशी चर्चा केली. विशेष म्हणजे दीपक पांडे यांनी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या अटकेचे आदेश काढले होते.

या भेटीनंतर पांडेय यांनी माध्यमांशी बोलताना ही सदिच्छा भेट असल्याचे सांगितले. राज ठाकरे हे एका जबाबदार पक्षाचे अध्यक्ष आहेत. 

त्यामुळे त्यांची सदिच्छा भेट घेतली. काही महिन्यांवर महापालिकेच्या निवडणुका होणार असल्याने कायदा आणि सुव्यवस्थेबाबत त्यांच्याशी चर्चा केल्याची माहिती पांडेय यांनी दिली. 

दरम्यान, मनसे कार्यकर्त्यावर गुन्हे दाखल झाले आहेत. राज ठाकरे ज्या हॉटेलमध्ये थांबले त्याच्या समोर मनसैनिकांनी होर्डिंग लावले होते. त्यावर पोलीस आणि महापालिका प्रशासनाने कारवाई केली. इतकंच नाही तर गुन्हेही दाखल केले आहेत.

COMMENTS