Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

राज्य सरकारने तृतिय पंथीयांना देखील मदत करावी – विक्रम राठोड

सध्या कोरोना संकटाच्या काळात संपूर्ण राज्यात जनता कर्फ्यू लागू झाला आहे.दिवसभर काम धंदा बंद असल्याने हातावर पोट असलेल्या लोकांवर उपासमारीची वेळ आली आहे.

नगरच्या उड्डाण पुलाचे काम अंतिम टप्प्याच्या दिशेने ; खांबांवर सिमेंट प्लेटा टाकल्या जाणार, सहा महिने चालणार काम
43 वर्षांनंतर पुन्हा भरली कोतुळची शाळा
एलआयसीच्या एमडीआरटी पुरस्काराने कल्पना लवांडे सन्मानित

अहमदनगर : सध्या कोरोना संकटाच्या काळात संपूर्ण राज्यात जनता कर्फ्यू लागू झाला आहे.दिवसभर काम धंदा बंद असल्याने हातावर पोट असलेल्या लोकांवर उपासमारीची वेळ आली आहे.त्यात राज्या तील तृतीय पंथीय जे दारोदार भिक्षा मागून आपली उपजीविका करतात त्यांना एक वेळचे अन्न देखील मिळणे महाग झाले आहे.त्यामुळे कोरोना संकट काळात राज्य सरकारने तृतीय पंथीयांना मदत करावी,अशी विनंती करणारा इमेल युवा सेनेचे जिल्हाध्यक्ष विक्रम राठोड यांनी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पाठविला आहे.राज्याच्या मुख्य सचिवांना देखील या इमेलची प्रत पाठविण्यात आली आहे. 

 कोरोनाचे संकट राज्यावर अधिक गडद होत असताना सर्व व्यवहार बंद ठेऊन सर्वाना घरात बसावे लागते आहे.पण यामुळे काबाड कष्ट करून आपले व कुटुंबाचे पोट भरणाऱ्यावर कोरोना मुळे नाही तर उपासमारीने जीव गमावण्याची वेळ आली आहे. अशा स्थितीत राज्यातील तृतीय पंथीय बांधव की ज्यांची रोजी रोटी केवळ भिक्षेवर आहे.त्यांच्यासमोर तर मोठा प्रश्न उभा राहिला आहे.त्यामुळे राज्याच्या तृतीय पंथीय कल्याणकारी संस्थेचे राज्य अध्यक्ष काजल गुरु नायक नगरवाले यांनी राज्यातील तृतीय पंथीय समाजाची व्यथा मुख्यमंत्री उद्धव साहेब ठाकरे यांच्यापर्यंत पोहोचविण्यासाठी युवा सेनेचे जिल्हाध्यक्ष विक्रम अनिल राठोड यांच्याकडे मदतीची याचना केली. तेव्हा विक्रम राठोड यांनी त्यांचे निवेदन स्वीकारून त्याचा थेट उद्धव साहेब आणि राज्य सरकारच्या मुख्य सचिवांना इमेल करून संपर्क साधला. या संदर्भात पाठपुरावा करून तृतीय पंथीयांना तात्काळ राज्य शासनाकडून मदत उप लब्ध करून देण्याचे आश्वासन राठोड यांनी तृतीय पंथीयांच्या शिष्ट मंडळाला दिले आहे.या इमेल मध्ये त्यांनी नमूद केले आहे की,कोरोना जनता कर्फ्यूच्या काळात सामान्य नागरिकांना रस्त्यावरून फिरण्याची मुभा नाही.त्यामुळे अनेकांचे रोजगार बुडालेले आहेत.अशातच तृतीय पंथीय बांधव जे रस्त्यावर फिरून भीक मागू शकत नाहीत. कोरोनाच्या काळात या तृतीय पंथीयांना कोणीही भीक देत नाही तसेच त्यांना भीक मागण्यासाठी कोणीही रस्त्यावर फिरू देत नाही की रस्त्यावर उभे राहू देत नाही.त्यामुळे प्रामुख्याने फक्त भिक्षा मागून आपले कुटुंब चालविणाऱ्या या समाजावर उपास मारीने कुपोषित होण्याची वेळ आली आहे.मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी लॉक डाऊन जाहीर करतांना सामान्य गोरगरीब कष्टकरी जनतेला तसेच रिक्षा चालकांना सानुग्रह अनुदान स्वरूपात रोख रक्कम दिली.त्याच पद्धतीने या समाजाला रोख रकमेच्या स्वरूपात तसेच अन्न धान्याच्या स्वरूपात मदत करावी.फक्त नगर शहरातच या तृतीय पंथीयांची २०० कुटुंब राहतात.तेव्हा राज्यात हजारोंच्या संख्येने या वर्ग राहतो आहे.तेव्हा त्यांना तातडीची मदत कारवी अशी,दयेची याचना करणारा इमेल पाठविण्यात आला आहे.

COMMENTS