Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

राज्यात या ऑक्टोबरला वाजणार ‘शाळेची घंटा’

मुंबई ः कोरोनामुळे गेल्या दीड वर्षांपासून बंद असलेल्या शाळांची घंटा वाजणार असून, राज्यात 04 ऑक्टोबरपासून शाळा सुरू होणार आहेत. शाळा सुरू करण्याच्या श

परीक्षेत पात्र, निवड मात्र दुसर्‍यांची ; आरोग्य विभाग भरती; निवड न झालेले उमेदवार संतप्त
पिकांना 25 हजार तर फळबागांना 50 हजार द्या ; अतिवृष्टी-गारपीट नुकसानीच्या भरपाईची मागणी,
राष्ट्रसंत जनार्दन स्वामी फार्मसीच्या विद्यार्थ्यांची चमकदार कामगिरी


मुंबई ः कोरोनामुळे गेल्या दीड वर्षांपासून बंद असलेल्या शाळांची घंटा वाजणार असून, राज्यात 04 ऑक्टोबरपासून शाळा सुरू होणार आहेत. शाळा सुरू करण्याच्या शालेय विभागाच्या प्रस्तावाला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मान्यता दिल्याची माहिती शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली.
राज्यात ग्रामीण भागात 5 वी ते 12 वी चे वर्ग 4 ऑक्टोबरपासून सुरू होणार आहेत. त्यासोबतच, शहरी भागात 8 वी ते 12 वीचे वर्ग सुरू होतील. यासाठी टास्क फोर्स आणि राज्य सरकारने मिळून बनवलेली नियमावली सर्व शाळा, पालक आणि विद्यार्थ्यांना लागू असणार आहे.
राज्यातील शाळा सुरु करण्यासंदर्भात ऑगस्ट महिन्यात एकदा प्रयत्न करण्यात आला होता. मात्र, त्यावेळी तो निर्णय स्थगित करण्यात आला होता. मुख्यमंत्री यांनी कोरोनाचे नियमांचे पालन करुन शाळा सुरु करण्यास मंजुरी दिली आहे. गेल्या वर्षीपासून शाळा बंद होत्या. कोरोनाची रुग्णसंख्या कमी झाल्याने शाळा सुरु करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. बहुतांश ठिकाणी लसीकरण झाले आहे. शिक्षक आणि शालेय कर्मचारी यांचे लसीकरण झालेले आहे. त्यामुळे शाळा सुरु करण्याच्या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली आहे.

तर शाळा सुरू किंवा बंद ठेवण्याचा जिल्हाधिकार्‍यांना अधिकार ः प्रा. वर्षा गायकवाड
शाळा सुरू झाल्यानंतर जर पुन्हा कोरोना रुग्ण वाढले तर शाळा सुरु किंवा बंद करण्याबद्दल जिल्हाधिकार्‍यांना अधिकार राहतील, असे शालेय शिक्षण मंत्री प्रा. वर्षा गायकवाड यांनी म्हटले आहे. विद्यार्थ्यांबद्दल शिक्षकांना अवगत करून देणे आणि त्यांच्याशी कसे वागावे हे शिक्षकांना सांगावे. शिक्षक आणि पालक यांच्या बैठकीत काय चर्चा व्हायला हवी. तसेच, घरात शिरताना मुलांनी काय काळजी घ्यायला हवी, गणवेश धुवायला टाकणे, लागलीच आंघोळ करणे, अशा बाबींचा नियमावलीत समावेश करण्यात आला आहे, असे वर्षा गायकवाड म्हणाल्या. याशिवाय, विद्यार्थ्यांना शाळेत पाठवण्यासाठी पालकांची संमती असणे, विद्यार्थ्यांच्या हजेरीसाठी शाळेने सक्ती न करणे, विद्यार्थ्यांमध्ये शारिरीक अंतर ठेवणे, शक्य असेल तिथे एक दिवसाआड शाळा ठेवणे, या बाबी देखील नियमावलीत आहेत, अशी माहिती वर्षा गायकवाड यांनी दिली.

COMMENTS