राज्यात वीकएंड लॉकडाऊन ; शुक्रवार रात्रीपासून सोमवार सकाळपर्यंत कडक संचारबंदी

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

राज्यात वीकएंड लॉकडाऊन ; शुक्रवार रात्रीपासून सोमवार सकाळपर्यंत कडक संचारबंदी

राज्यात संपूर्णपणे नसली तरी अंशत: टाळेबंदी जाहीर करण्यात आली आहे.

लोकप्रतिनिधींना शेतकऱ्यांच आणि गोरगरीब जनेतेचे देणंघेणं नाही त्यांना फक्त राजकारण करायचे:- गोकुळ दौड
टिटवी येथे बंजारा परंपरेतील तीज सण उत्साहात 
कोठला परिसरात गोवंशीय मांसासह एकास अटक

मुंबई/प्रतिनिधी: राज्यात संपूर्णपणे नसली तरी अंशत: टाळेबंदी जाहीर करण्यात आली आहे. राज्यात वीकएंड लॉकडाऊन जाहीर करण्यात आला असून शनिवार आणि रविवारी संपूर्ण राज्यात कडकडीत बंद राहणार आहे. राज्यात कोरोनाबाधितांची संख्या वेगाने वाढत आहे. त्यामुळे सरकारला संसर्गाची साखळी तोडण्यासाठी उपाययोजना करणे आवश्यक होते. त्यानुसार गेल्या दोन दिवसांपासून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे विविध घटकांशी चर्चा करीत होते. त्यांनी उद्योजक, व्यापारी, चित्रपट कलावंत, माध्यमांच्या संपादक, मालकांशी चर्चा केली. त्यानंतर टाळेबंदी जाहीर करण्यापूर्वी त्यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, मनसेचे प्रमुख राज ठाकरे यांच्यांशी स्वतः संपर्क साधून टाळेबंदी अपरिहार्य असून त्यासाठी सहकार्याची आवश्यकता व्यक्त केली. 

 राज्याच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत यावर चर्चा झाली. टाळेबंदीला राष्ट्रवादी काँग्रेसने केलेला विरोध मागे घेतला. त्यानंतर काँग्रेसच्या मंत्र्यांना विश्‍वासात घेऊन उपाययोजना जाहीर करण्यात आल्या. मंत्रिमंडळाच्या बैठकीतील निर्णयाची माहिती राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी दिली. राज्यात वीकएंड लॉकडाऊन लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला. शुक्रवारी रात्री आठ वाजल्यापासून टाळेबंदी सुरू होईल. ती सोमवारी सकाळी संपेल. दर आठवड्याला शनिवार आणि रविवारी राज्यात कडकडीत बंद राहणार आहे. फक्त यातून अत्यावश्यक सेवा वगळण्यात आल्या आहेत. तसेच टाळेबंदीची नियमावली उद्या रात्री आठ वाजता जारी करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. राज्यात वीकएंड लॉकडाऊनच्या राज्यात बागा, चौपाट्या, धार्मिक स्थळे बंद राहतील. तसेच सर्व प्रकारचे धार्मिक, सामाजिक आणि राजकीय कार्यक्रमही बंद राहणार आहेत. फक्त पुजार्‍यांना मंदिरात पूजा करण्यासाठी मुभा देण्यात आली आहे. राज्यात कोरोना वाढत असताना एकजुटता दिसली पाहिजे, त्यामुळेच मुख्यमंत्र्यांनी राजकीय नेते आणि विविध क्षेत्रातील मान्यवरांशी चर्चा केल्याचे मलिक यांनी स्पष्ट केले.

टाळेबंदीची माहिती दोन दिवस अगोदर ः पवार

गेल्या वेळी पंतप्रधानांनी अचानक टाळेबंदी लावली आणि मजूर अडकले. आम्हाला या वेळी तसे होऊ द्यायचे नाही. महाराष्ट्रात टाळेबंदी लावण्याची वेळ आलीच, तर नागरिकांना दोन दिवसांचा वेळ देऊ, अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली. 

अशी असेल टाळेबंदी

ःःःःःःः..

*मॉल, बार, रेस्टॉरंट बंद करण्याचा निर्णय, डिलिव्हरी सर्व्हिस चालू

* सरकारी कार्यालय 50 टक्के क्षमतेने काम करणार

* उद्योग चालू राहणार, कामगारांवर कुठलेही निर्बंध नाहीत

*बांधकाम चालू, सरकारी ठेके असलेली कामे सुरू राहणार

*भाजी मार्केटवर कुठल्याही प्रकारचे निर्बंध नाहीत. फक्त गर्दी कमी करण्यासाठी कठोर निर्णय

*गर्दी होणार नाही तिथे शूटिंगला परवानगी, चित्रपटगृहे बंद राहणार

*सर्व ट्रान्सपोर्ट व्यवस्था सुरू राहणार, बस, रेल्वे, टॅक्सी सुरू

* प्रवासी क्षमता मात्र कमी; मुखपट्टी बंधनकारक, 

*क्षमतेच्या 50 टक्क्यांनी सर्व सार्वजनिक वाहतूक सुरू राहणार

COMMENTS