राज्यात विरोधात, आणि ‘या’ ठिकाणी भाजप – महाविकास आघाडी आली एकत्र

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

राज्यात विरोधात, आणि ‘या’ ठिकाणी भाजप – महाविकास आघाडी आली एकत्र

जळगाव : प्रतिनिधी जळगाव जिल्हा बँक संचालक मंडळ निवडणुकीसाठी भाजपासह सर्व पक्षीय पॅनल निश्चित झाले. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसने भाजपाशी हातमिळव

भाजपा तर्फे देशभर ८२ तीर्थक्षेत्री कार्यक्रमांचे आयोजन
इस्लामपूर भाजपा कार्यालयावर उच्च न्यायालयाचा हातोडा
Nanded : कोणी सोडून गेल्याने भाजपाला फरक पडत नाही (Video)

जळगाव : प्रतिनिधी

जळगाव जिल्हा बँक संचालक मंडळ निवडणुकीसाठी भाजपासह सर्व पक्षीय पॅनल निश्चित झाले. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसने भाजपाशी हातमिळवणी केलीच. 

यासंदर्भात माहिती शिवसेना नेते पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी माहिती दिली. जळगाव जिल्हा बॅंकेत सर्व नेते आपल्या समर्थकांना संचालक करण्यात यशस्वी होतील. त्याचबरोबर, अनेक इच्छुक संधी गमावणार असल्याने नेत्यांना त्यांच्या नाराजीला सामोरे जावे लागेल.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निकटवर्तीयांच्या घरावर आयकर विभागाने छापेमारी केल्याने राष्ट्रवादीने सर्वपक्षीय पॅनलमध्ये भाजपा नको अशी भूमिका घेतली होती. 

त्यामुळे सर्वपक्षीय पॅनल होणार की नाही, याबाबत संभ्रम आहे. मात्र, पॅनल करण्याबाबत येथील अजिंठा विश्रामगृहात पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या नेतृत्वाखाली बैठक घेण्यात आली.

या बैठकीला भाजपतर्फे गिरीश महाजन, आमदार सुरेश भोळे, राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे गुलाबराव देवकर, डॉ. सतीश पाटील, काँग्रेसतर्फे प्रदीप पवार, आमदार शिरीष चौधरी, शिवसेनेतर्फे गुलाबराव पाटील व चिमणराव पाटील उपस्थित होते. 

यावेळी गुलाबराव पाटील यांनी सांगितले की, सर्व पक्षीय पॅनेलसाठी जागा वाटप निश्चित झाले आहे. राष्ट्रवादी व भाजपा यांना सात जागा, शिवसेनेला पाच तर काँग्रेसला दोन जागा देण्यात येणार आहे. प्रत्येक पक्ष त्यांच्या राज्यस्तरीय नेत्यांशी चर्चा करून निर्णय घेईल. त्यानंतरच जागा वाटप करण्यावर अंतिम शिक्कामोर्तब होईल, असे पाटील यांनी सांगितले.

COMMENTS