राज्यातील निवासी डॉक्टरांचे कामबंद आंदोलन मागे

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

राज्यातील निवासी डॉक्टरांचे कामबंद आंदोलन मागे

मुंबई: गेल्या 1 ऑक्टोबर पासून सुरू असलेले राज्यातील निवासी डॉक्टरांचे काम बंद आंदोलन सोमवारी मागे घेण्यात आले. मुंख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची मार्डच्

नगर अर्बन बँकेविरोधात एल्गार…व्यापारी करणार उपोषण | LokNews24
नगर शहरात ‘या’ ठिकाणी महाराजांचा १२ फुट पुतळा उभारणार | LOKNews24
बीडमध्ये भव्य दिव्य सर्वरोग मोफत महाआरोग्य शिबीर.

मुंबई: गेल्या 1 ऑक्टोबर पासून सुरू असलेले राज्यातील निवासी डॉक्टरांचे काम बंद आंदोलन सोमवारी मागे घेण्यात आले. मुंख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची मार्डच्या प्रतिनिधींशी झालेली चर्चा यशस्वी ठरल्यानंतर आंदोलन मागे घेत असल्याचे जाहीर करण्यात आले. यावेळी मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी झालेल्या चर्चेत निवासी डॉक्टरांच्या समस्यांचे मुद्दे उपस्थित करण्यात आले. या बैठकीला पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे, वित्त व वैद्यकीय शिक्षण विभागाचे सचिव डॉ. दिलीप म्हैसेकर, मध्यवर्ती मार्ड संघटनेचे अध्यक्ष डॉ. ज्ञानेश्वर ढोबळे पाटील, शिवाय राज्यातील पदाधिकारी आणि अधिकारी उपस्थित होते. यात निवासी डॉक्टर यांच्या सर्व मागण्यावर साकारात्मक चर्चा झाली व एका महिन्यात पूर्तता करण्यात येईल अशी ग्वाही देण्यात आली. निवासी डॉक्टरांच्या प्रत्येक समस्येवर शासनाकडून समाधानकारक उत्तरे मिळाली असल्याने मार्ड संघटनेने संप मागे घेतल्याचे जाहीर केले. हे सर्व डॉक्टर्स उद्या, मंगळवारपासून रुग्णसेवेत रुजू होणार आहेत. तसेच डॉक्टरांच्या मागण्यांची पूर्तता एका महिन्यात करण्यात येईल, अशी ग्वाही सरकारकडून देण्यात आली. दरम्यान, यात राज्यातील सर्व सरकारी व महानगर पालिका वैद्यकीय महावियालयातील निवासी डॉक्टर यांना त्यांच्या कार्याचा सन्मान आणि ऋणानुबंध व्यक्त करण्यासाठी सन्मान निधी देण्यात येणार आहे. काम बंद आंदोलनाच्या केंद्रस्थानी असलेली मागणी म्हणजे शैक्षणिक शुल्क माफी ही तांत्रिक बाबीमुळे अशक्य असल्याने त्या क्षेत्रातील तज्ज्ञ लोकांसोबत चर्चा करून यावर निर्णय घेण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. तर पालिका वैद्यकीय महाविद्यालयातील टीडीएसबद्दल तज्ज्ञ चार्टर्ड अकाउंट यांच्याकडून मत घेऊन शक्य तो सकारात्मक निर्णय घेतला जाईल असे सांगण्यात आले. सर्व सरकारी व महानगरपालिका वैद्यकीय महाविद्यालयातील निवासी वसतिगृहामध्ये आवश्यक त्या सुधारणा करण्यात येतील. असा तोडगा काढण्यात आल्याने मार्ड संघटनेने काम बंद आंदोलन मागे घेतल्याचे जाहीर केले.

COMMENTS