राज्यसभेत महिला खासदारांवर मार्शलकरवी हल्ला ; काँगे्रसचा गंभीर आरोप

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

राज्यसभेत महिला खासदारांवर मार्शलकरवी हल्ला ; काँगे्रसचा गंभीर आरोप

नवी दिल्ली/प्रतिनिधी : संसदेचे पावसाळी अधिवेशनाचे सूप वाजले असले तरी देखील राज्यसभेत बुधवारी झालेल्या धक्काबुक्कीचे पडसाद गुरूवारी संपूर्ण देशभरात उम

मराठ्यांना ओबीसी दाखले देवू नका
महाराष्ट्रद्वेषाची कावीळ
केडगाव येथे महिलेस लोखंडी पाईपने मारहाण

नवी दिल्ली/प्रतिनिधी : संसदेचे पावसाळी अधिवेशनाचे सूप वाजले असले तरी देखील राज्यसभेत बुधवारी झालेल्या धक्काबुक्कीचे पडसाद गुरूवारी संपूर्ण देशभरात उमटले. राज्यसभेमध्ये पेगॅसस, कृषी कायदे या मुद्द्यांवरून काँग्रेससह इतर विरोधी पक्षाच्या खासदारांनी तुफान गदारोळ घातला. यावेळी मार्शल्सकरवी हा सर्व गोंधळ आवरावा लागला. यावेळी मार्शल्सनी चुकीच्या पद्धतीने राज्यसभा सदस्यांना वागणूक दिल्याचा दावा विरोधकांनी केला. एक महिला खासदाराची एका महिला मार्शलसोबत धक्काबुक्की झाल्याचे दिसून येत आहे. याप्रकरणांचा व्हिडिओ समोर आल्यानंतर विरोधकांनी आक्रमक पवित्रा घेतल्याचे पाहायला मिळाले.
विरोधी पक्षांनी गुरुवारी संयुक्त मोर्चा काढला. काँग्रेस खासदार राहुल गांधी यांच्या नेतृत्वात निघालेल्या या मोर्चात डझनहून अधिक राजकीय पक्ष सहभागी झाले होते. यावेळी राहुल गांधी यांनी सरकारवर गंभीर आरोप केले, तसेच सभागृहात खासदारांसोबत गैरवर्तन झाल्याचेही ते म्हणाले. यावेळी काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी आरोप केला की, राज्यसभेत पहिल्यांदाच खासदारांना मारहाण करण्यात आली. बाहेरून लोकांना बोलावले गेले आणि खासदारांसोबत धक्का-बुक्की करण्यात आली. सभापतीची जबाबदारी सभागृह चालवण्याची असते. विरोधकांची बाजू सभागृहात का ठेवू शकत नाही? असा सवाल देखील त्यांनी उपस्थित केला. राहुल गांधी म्हणाले, देशाचे पंतप्रधान आज देश विकण्याचे काम करत आहेत. देशाचा आत्मा दोन-तीन उद्योगपतींना विकला जात आहे. विरोधक संसदेत काहीही बोलू शकत नाहीत. देशातील 60 टक्के लोकांचा आवाज दाबला जात आहे, राज्यसभेत खासदारांशी गैरवर्तन करण्यात आले. आम्ही सरकारसोबत पेगासस मुद्द्यावर चर्चा करण्यासंदर्भात बोललो, आम्ही शेतकरी आणि महागाईचा मुद्दा उचलला. तसेच, ही लोकशाहीची हत्या आहे. असेही राहुल गांधी यावेळी म्हणाले. राज्यसभेमध्ये बुधवारी झालेल्या अभूतपूर्व राड्यानंतर देशभर संमिश्र प्रतिक्रिया उमटू लागल्या आहे. विरोधी पक्षांनी यासाठी सत्ताधारी मोदी सरकारला जबाबदार धरले असतांना सत्ताधार्‍यांनी मात्र विरोधकांवरच टीका केली आहे. लोकसभा आणि राज्यसभेतील विरोधकांच्या गदारोळावरून क केंद्रातील 7 मंत्र्यांनी एकाचवेळी पत्रकार परिषध घेत विरोधकांच्या आरोपांना प्रत्युत्तर दिले. विरोधकांनी जनतेचे कुठले मुद्दे संसदेत मांडले. विरोधकांचा संसद ते रस्त्यापर्यंत एकमेव अजेंडा हा फक्त अराजकता निर्माण करण्याचा आहे. हे नक्राश्रू गाळू नका, विरोधकांनो देशाची माफी मागा, असे संसदीय कामकाजमंत्री प्रल्हाद जोशी यावेळी म्हणाले.

सभागृहात इतके मार्शल्स ठेवण्याचे कारण काय ? छाया वर्मा
या गोंधळाविषयी आणि महिला मार्शलशी झालेल्या धक्काबुक्कीविषयी छाया वर्मा यांना विचारणा केली असता त्यांनी सत्ताधार्‍यांवर निशाणा साधला. आमचे एक खासदार कालच्या घटनेमध्ये जखमी झाले आहेत. त्यांना चुकीची वागणूक दिली गेली. पियुष गोयल यांना विचारा की सभागृहात इतके मार्शल्स ठेवण्याचे कारण काय? मी का माफी मागू? असा प्रश्‍न छाया वर्मा यांनी विचारला आहे. दरम्यान, सभागृह चालवणे ही सरकारची जबाबदारी असल्याचं छाया वर्मा यावेळी म्हणाल्या. या प्रकाराला कोण जबाबदार आहे? असा सवाल देखील त्यांनी उपस्थित केला.

हा तर लोकशाहीवर हल्ला : शरद पवार
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी देखील यावर टीका करताना आपल्या 55 वर्षांच्या कारकिर्दीत असे काही बघितले नसल्याचे म्हटले आहे. संसदेतील माझ्या 55 वर्षांच्या करिअरमध्ये (राज्यसभा) महिला खासदारांवर ज्याप्रकारे हल्ला करण्यात आला तसं कधीच पाहिलेलं नाही. सभागृहात बाहेरुन 40 पुरुष आणि महिलांना आणण्यात आले. हे वेदनादायी असून लोकशाहीवर हल्ला आहे. सभागहात हे योग्य झाले नाही, असे शरद पवार म्हणाले आहेत.

COMMENTS