राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी यांना घरातूनच अभिवादन करा- हिरे

Homeमहाराष्ट्रअहमदनगर

राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी यांना घरातूनच अभिवादन करा- हिरे

संपूर्ण जगभर सध्या कोरोना व्हायरस या महामारीने थैमान घातले आहे. आणि त्यातच आपल्या महाराष्ट्र मध्ये याचा जास्त प्रादुर्भाव दिसून येत आहे.

मनोज जरांगे यांची संगमनेरमध्ये आज जाहीर सभा
गोसेवा आयोग स्थापन करणारे महाराष्ट्र एकमेव राज्य
वसंत रांधवण यांना निर्भिड पत्रकार पुरस्कार जाहीर

कोपरगाव शहर प्रतिनिधी- संपूर्ण जगभर सध्या कोरोना व्हायरस या महामारीने थैमान घातले आहे. आणि त्यातच आपल्या महाराष्ट्र मध्ये याचा जास्त प्रादुर्भाव दिसून येत आहे. आपल्याला या महामारी वरती  विजय मिळवायचा असेल तर आपल्याला हे युद्ध रणांगनात नव्हे तर घरात राहूनच जिंकावे  लागणार आहे. म्हणून येणाऱ्या  दिनांक ३१ में रोजी होणारी  राजमाता पुण्यश्लोक अहिल्याबाई  होळकर यांची जयंती घरातच  साजरी करावी असे आवाहन  धनगर समाज युवा मल्हार सेनेच्या वतीने करण्यात आले आहे. 
राजमाता पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांचे कार्य सर्व समाजसाठी प्रेरणादायी असून त्याचा आदर्श जगासमोर परत एकदा सिद्द करण्यासाठी सर्व समाज बांधवांनी यंदाची अहिल्याबाई होळकर जयंती निमित्त आपल्या घरात राहूनच अभिवादन करत सार्वजनिक ठिकाणी गर्दी न करता प्रशासनाला व आपला जीव धोक्यात घालून अहोरात्र कोरोना रुग्ण संख्या आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न करणारे आरोग्य यंत्रणेला सहकार्य करत साजरी करावी. असे आवाहन धनगर समाज युवा मल्हार सेनेचे  जिल्हा निरीक्षक सोमनाथ हिरे तसेच अंकुश,फटागरे,  राहुल अदमाने, सागर,कोलपे, किरण फटागरे, शरद हीरे, मारुति सोनवणे, नवनाथ धुमसे,साईनाथ फटागरे, संदीप फटागरे, सागर,फटागरे, जालिंदर दहाडदे,सागर नेहे,दत्तू हिरे, अदि समाज बांधवांनी केले आहे.

COMMENTS