राजगुरूनगर पंचायत समितीमध्ये अविश्‍वास ठराव मंजूर

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

राजगुरूनगर पंचायत समितीमध्ये अविश्‍वास ठराव मंजूर

राजगनरूनगरमध्ये सुरू असलेल्या राजकीय नाट्याला आता आणखी वेगळे वळण लागले आहे. इथे सुरू असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेच्या भांडणात भाजपचा फायदा होईल अशी चिन्हे आहेत.

Chandrakant Patil : चंद्रकांत पाटलांकडून शरद पवारांचा एकेरी उल्लेख | LokNews24
बंद गाळ्यात मानवी अवयव सापडल्याने खळबळ | LOKNews24
कोतुळ ते संगमनेर प्रांत कार्यालय 55 किलोमीटरची ट्रॅक्टर रॅली

राजगुरूनगर / प्रतिनिधी: राजगनरूनगरमध्ये सुरू असलेल्या राजकीय नाट्याला आता आणखी वेगळे वळण लागले आहे. इथे सुरू असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेच्या भांडणात भाजपचा फायदा होईल अशी चिन्हे आहेत. पंचायत समितीचे सभापती भगवान पोखरकर यांच्याविरुद्ध दाखल केलेला अविश्‍वास ठराव अकरा विरुद्ध तीन अशा मतांनी मंजूर झाला आहे. त्यामुळे आता भाजपचे उपसभापती सभापतिपदी नेमले जाऊ शकतात.

4 मे ला सभापतीविरुद्ध शिवसेनेच्या सहा सदस्यांनी बंड पुकारून हा अविश्‍वास ठराव दाखल केला होता. त्याला राष्ट्रवादी काँग्रेस व भाजपच्या सदस्यांनी साथ दिली. या ठरावावर आज पंचायत समितीच्या सभागृहात उपविभागिय अधिकारी विक्रांत चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली सभा झाली. या वेळी त्यांनी सभागृहात अविश्‍वास ठराव मांडला. यावर आजी माजी सभापती, उपसभापती व सदस्यांनी मते मांडली. हात वर करून मतदान घेण्यात आले. ठरावाच्या बाजूने 11 जणांन हात वर केले. भगवान पोखरकर, अमोल पवार, ज्योती आरगडे यांनी ठरावाच्या विरोधी मतदान केले. शिवसेनेच्या सुनीता सांडभोर, वैशाली जाधव, सुभद्रा शिंदे, मच्छींद्र गावडे, अमर कांबळे, अंकुश राक्षे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अरुण चौधरी, मंदा शिंदे, वैशाली गव्हाणे, नंदा सुकाळे, व भाजपचे उपसभापती चांगदेव शिवेकर यांनी ठरावाच्या बाजूने मतदान केले. सभापती भगवान पोखरकर यांच्या विरोधात आलेल्या अविश्‍वास ठरावाबाबत विशेष सभा असल्याने कलम 144 (संचारबंदी) लागू करण्यात आली होती. त्यामुळे शहरात पोलिसांच्या छावणीचे स्वरूप आले होते. खेड पंचायत समितीचे शिवसेनेचे सभापती भगवान पोखरकर यांच्या विरोधात सर्वपक्षीय 14 पैकी 11 जणांच्या वतीने 24 मे रोजी अविश्‍वास ठराव दाखल करण्यात आला होता. सदस्य राजकीय सहलीसाठी गेले होते. डोणजे येथील एका रिसोर्टमध्ये पंचायत समिती सदस्य मुक्कामी असलेल्या ठिकाणी सभापती पोखरकर व त्यांच्या सहकार्‍यांनी जाऊन धिंगाणा घातला होता. या घटनेबाबत खेडचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार दिलीप मोहिते पाटील व शिवसेनेचे माजी खासदार शिवाजी आढळराव पाटील यांच्यामध्ये आरोप प्रत्यारोपांची खैरात झाली होती. गेल्या दोन दिवसापासून खेड समिती पंचायतीसमोर पोलिसाचा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. सभापती भगवान पोखरकर यांना सभेत भाग घेण्यासाठी न्यायालयीन परवानगी मिळाली असल्याने पोलिस बंदोबस्तामध्ये त्यांना राजगुरूनगर येथे आणण्यात आले.

COMMENTS