कोरोनाच्या या जीवघेण्या संकटात रेमडेसिव्हीर व ऑक्सिजनच्या तुटवड्यामुळे सर्वजण हतबल झालेले आहेत.
कोपरगांव शहर प्रतिनिधी- कोरोनाच्या या जीवघेण्या संकटात रेमडेसिव्हीर व ऑक्सिजनच्या तुटवड्यामुळे सर्वजण हतबल झालेले आहेत. रुग्णसंख्या प्रचंड प्रमाणांत वाढून मृतांची संख्याही दररोज वाढत आहे. अशा काळात पत्रकार परिषदेत “राजकिय जोडे काढून एकत्र या” असा शहाजोग सल्ला देणारे विवेक कोल्हे याच पत्रकार परिषदेत राजकीय टोमणे मारतांना दिसतात.
आ.आशुतोष काळेंनी उभारलेल्या कोविड सेंटर बद्दलही वेगळ्याच अर्थाचे बोलतात. कुठलीही सत्ता नसल्याचे शल्य बोलून दाखविताना “आमदारांप्रमाणे माझ्या सासूबाई जिल्हा परिषद अध्यक्षा नाहीत” असे बायकी टोमणे मारतात. विवेक कोल्हे यांनी कोविडच्या संकटात तरी राजकारण करू नये. तुम्ही पुरण पोळ्या वाटप केले चांगलेच आहे. पुरण पोळ्यांचा खर्च तुम्ही तुमच्या घामाच्या पैशातून दिलेला नाही हे सर्व तालुका जाणतो. प्रसिद्धीसाठी थातुरमातुर काम न करता संजीवनीच्या माध्यमातून ऑक्सिजन प्रकल्प उभारा. शेतकऱ्यांच्या मेहनतीवरच संजीवनीचा डोलारा उभा आहे. निवडणुकीत कोट्यावधी रूपये उधळता, पण आज मतदार संकटात असतांना हात आखडता का घेता? भव्य ऑक्सिजन प्रकल्प का उभारू शकत नाही? याचे आधी उत्तर व नंतर नेतेगिरी करा अशी जहरी टीका भाजपा चे माजी शहराध्यक्ष प्रा.सुभाष शिंदे यांनी विवेक कोल्हे यांच्या वर केली आहे.
COMMENTS