नाशिक : राजकारणात अशक्य काही नसते हे शरद पवारांनी महाआघाडी सरकारच्या रुपात दाखवून दिले असून उद्याचा नाशिकचा महापौर हा राष्ट्रवादीचाच असेल असा ठाम विश
नाशिक : राजकारणात अशक्य काही नसते हे शरद पवारांनी महाआघाडी सरकारच्या रुपात दाखवून दिले असून उद्याचा नाशिकचा महापौर हा राष्ट्रवादीचाच असेल असा ठाम विश्वास राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष मेहबूबभाई शेख यांनी व्यक्त केला. राष्ट्रवादी भवन येथे आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते.
युवक राष्ट्रवादीने कोरोना काळात कोविड सेंटरमध्ये काम करणे, गरजूंना मदत करणे, पूरग्रस्तांना मदत पाठवणे असे अनेक जनहितार्थ काम केले. सामाजिक कार्य करत असताना नवीन युवा वर्ग हे सर्व बघून राष्ट्रवादीकडे आकर्षित होत असून पक्षामध्ये प्रवेश करत आहे. त्यामुळे राष्ट्रवादीची ताकद वाढू लागली आहे. नाशिक महानगरपालिका निवडणुकीस ६ महिने कालावधी असून रात्रीचा दिवस करून काम करावे लागणार आहे. वॉटर, मीटर, गटर हे तीन प्रश्न सोडवून युवक राष्ट्रवादी करत असलेले काम जनतेपर्यंत पोहचवा. सुट्टीच्या दिवशी नागरिकांना भेटून त्यांच्या समस्या जाणून घ्या, बूथ यंत्रणा सक्षम बनवा तरच नगरसेवक होणे शक्य आहे. पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार साहेबांची भूमिका जास्तीत जास्त युवकांना संधी देणे आहे. जनतेचे प्रश्न सोडवून लोकप्रियता वाढलेल्यांना यावेळी उमेदवारीवर हक्क सांगता येणार आहे.
राजकारणात २ पावले मागे घेऊन काम करतात तेच पुढे जातात. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये तळागाळातील कार्यकर्ता मोठा होऊ शकतो हे माझ्यावरून लक्षात येते. कष्ट आणि इनामदारी असेल तर शिखर गाठता येते. घरातील पार्श्वभूमी राजकारणी नाही तरीही युवक प्रदेशाध्यक्ष पद मिळाले असल्याचे यावेळी त्यांनी आपल्या भाषणात सांगितले.
COMMENTS