रस्त्याच्या कामात सव्वा दोन लाखांचा अपहार, हराळ दाम्पत्यासह ठेकेदार, अधिकार्‍यांवर गुन्हे दाखल करावेत

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

रस्त्याच्या कामात सव्वा दोन लाखांचा अपहार, हराळ दाम्पत्यासह ठेकेदार, अधिकार्‍यांवर गुन्हे दाखल करावेत

नगर :  नगर तालुक्यातील सारोळा कासार येथील नगर-सारोळा रोड ते काळे वस्ती रस्त्याच्या कामात ठेकेदार, जि.प.सदस्य अनिता हराळ व त्यांचे पती बाळासाहेब हर

शिवचरित्राचा अभ्यास व अनुकरण करणे गरजेचे ः जळकेकर महाराज
पिंपरी निर्मळ येथील गुन्ह्यातील 57 आरोपींना अटकपूर्व जामीन
शिर्डीत साईंच्या जयघोषात रंगांची उधळण

नगर : 

नगर तालुक्यातील सारोळा कासार येथील नगर-सारोळा रोड ते काळे वस्ती रस्त्याच्या कामात ठेकेदार, जि.प.सदस्य अनिता हराळ व त्यांचे पती बाळासाहेब हराळ यांनी अधिकार्‍यांना हाताशी धरुन सुमारे सव्वा दोन लाख रुपयांचा अपहार केला आहे. या कामाची चौकशी करून हराळ यांच्यासह ठेकेदार व अधिकार्‍यांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी अनिल माणिक धामणे यांनी केली आहे. याबाबत धामणे यांनी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र क्षीरसागर यांची भेट घेवून निवेदन दिले. पंधरा दिवसांत कार्यवाही न झाल्यास जिल्हा परिषदेसमोर आमरण उपोषणास बसण्याचा इशारा त्यांनी दिला आहे.

निवेदनात म्हटले आहे की, सारोळा कासार येथील नगर सारोळा रोड ते काळे वस्ती हा रस्ता जि.प.सदस्या अनिता बाळासाहेब हराळ यांच्या निधीतून देण्यात आला होता. वास्तविक पाहता हा निधी रेल्वेलाईन ते दिंडी रस्ता ते शिवाजी विश्वनाथ धामणे यांच्या घरापयर्ंतच्या रस्त्यासाठी दिला होता. तो रद्द करून तो सारोळा रोड ते काळे वस्ती रस्त्यासाठी वापरण्यात आला.

अनिता हराळ यांचे पती बाळासाहेब हराळ यांनी सदरचे काम ठेकेदार होले यांना दिले होते. सदर ठेकेदाराने संबंधित रस्त्यावर मुरुमाचे फक्त 36 ट्रॅक्टर टाकले व पसरवून दिले. त्यावर सोलिंग किंवा रोडरोलर काहीच फिरवले नाही. एवढेच काम करून रस्त्याच्या कामाचे सर्व 3 लाखांचे बिल जिल्हा परिषदेतून काढून घेतले. 36 ट्रॅक्टर मुरुमाची जास्तीत जास्त किंमत 70 ते 75 हजार झाली. उर्वरित जवळपास 2 लाख 25 हजार रुपये लाटण्यात आले. ही बिले हराळ यांनी अधिकार्‍यांना मॅनेज करून काढलेली आहे. त्यामुळे सदर कामाची चौकशी करावी तसेच ठेकेदार, हराळ दाम्पत्य व संबंधित अधिकार्‍यांवर अपहाराचा गुन्हा दाखल करण्याची मागणी निवेदनात  करण्यात आली आहे.

COMMENTS