रवी पुजारीची आर्थररोड तुरुंगात रवानगी

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

रवी पुजारीची आर्थररोड तुरुंगात रवानगी

नाशिक शहरातील पाथर्डी फाटा येथील बांधकाम व्यावसायिकाच्या कार्यालयावर गोळीबार करून दहा  कोटींची खंडणी मागितल्याप्रकरणी कुख्यात गुंड रवी पुजारीला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.

राजकीय वादातून चक्क ढाबाच दिला पेटवून | LOKNews24
बदलापूर घटनेतील आरोपीवर आणखी एक गुन्हा दाखल
मोदींच्या छळामुळे सुषमा स्वराज-जेटलींचा मृत्यू झाला: उदयनिधी स्टॅलिन | Lok News24

मुंबई / प्रतिनिधीः नाशिक शहरातील पाथर्डी फाटा येथील बांधकाम व्यावसायिकाच्या कार्यालयावर गोळीबार करून दहा  कोटींची खंडणी मागितल्याप्रकरणी कुख्यात गुंड रवी पुजारीला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. सहा दिवसांची पोलिस कोठडी संपल्यानंतर आज त्याला पुन्हा न्यायालयात हजर केले. न्यायालयाने त्याला न्यायालयीन कोठडी सुनावली. त्याची रवानगी मुंबईच्या आर्थर रोड तुरुंगात करण्यात आली आहे. 

इंदिरा नगर येथील गोळीबार आणि खंडणीच्या गुन्ह्यात त्याला पोलिस कोठडी सुनावण्यात आली होती. सहा दिवसांच्या पोलिस कोठडीनंतर त्याला नाशिक जिल्हा सत्र न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने त्याला 13 मे रोजीपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. आता त्याची रवानगी मुंबईतील आर्थर रोड तुरुंगात केली आहे. या प्रकरणात मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेकडून करण्यात येणारा तपास पूर्ण झाल्याचे पोलिसांनी न्यायालयात सांगितले. पुजारीचे या प्रकरणात फोन कॉल तपासण्यासाठी आवाजाचे नमुने घेण्यात आले. ते तज्ज्ञांकडे पाठवण्यात आले आहेत. त्याची कोरोना चाचणी करण्यासाठी जिल्हा रुग्णालयात नेले. त्यानंतर त्याची मुंबईतील आर्थर रोड तुरुंगात रवानगी करण्यात आली. त्याच्यावर दाखल असलेल्या विविध गुन्हे प्रकरणावरही या वेळी न्यायालयात सुनावणी घेण्यात आली, असे सरकारी वकील अजय मिसर यांनी सांगितले. पुजारीविरोधातील इतर गुन्ह्यांचा तपासही मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेकडून करण्यात येत आहे.

COMMENTS