रयत सेवक डॉ. शिवाजीराव चव्हाण यांचे निधन

Homeमहाराष्ट्रसातारा

रयत सेवक डॉ. शिवाजीराव चव्हाण यांचे निधन

इतिहासाचे गाढे अभ्यासक, प्रसिध्द वक्ते व सातारा जिप्हा परिषदेचे विद्यमान सदस्य रयत सेवक डॉ. शिवाजीराव चव्हाण (वय 76) यांचे रविवार, दि. 2 रोजी पहाटे हृदय विकाराच्या धक्क्याने निधन झाले.

फलटण येथे जुगाराच्या अड्ड्यावर छापा; 12 जणांविरोधात गुन्हा दाखल
शहरटाकळी येथे अखंड हरिनाम सप्ताहास 23 ला  प्रारंभ  
भक्तांच्या रक्षणार्थ नृसिंह महाराजांचा अवतार ः सुराशे महाराज


सातारा / प्रतिनिधी : इतिहासाचे गाढे अभ्यासक, प्रसिध्द वक्ते व सातारा जिप्हा परिषदेचे विद्यमान सदस्य रयत सेवक डॉ. शिवाजीराव चव्हाण (वय 76) यांचे रविवार, दि. 2 रोजी पहाटे हृदय विकाराच्या धक्क्याने निधन झाले. त्यांच्या पश्‍चात पत्नी, तीन मुले, मुलगी, सुना, जावई, नातवंडे असा परिवार आहे. ज्येष्ठ पत्रकार केशव चव्हाण, प्रसिध्द बांधकाम व्यावसायिक सयाजीराव चव्हाण तसेच मंगलमुर्ती हॉस्पिटलचे मालक डॉ. जयदीप चव्हाण याचे ते वडील होत. 

ते मुळचे सातारा तालुक्यातील भाटमरळी येथील डॉ. शिवाजीराव चव्हाण यांचा इतिहासाचा दांडगा अभ्यास होता. त्यांनी सेवानिवृत्तीनंतर छत्रपती शिवरायांचे स्त्रियांविषयीचे धोरण या विषयावर यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापिठातून डॉक्टरेट मिळविली होती. महाराजा सयाजीराव महाविद्यालयाचे विद्यार्थी ते शिक्षक असा हा त्यांचा जीवनपट रयत शिक्षण संस्थेच्या संर्पकात आल्यामुळे नावारुपास आला. सातारा येथील अद्यापक महाविद्यालयाच्या उपप्राचार्य पदावरुन ते सेवानिवृत्त झाले होते. तसेच इस्माईलसाहेब मुल्ला विधी महाविद्यालयात त्यांनी कायद्याच्या पदवी अभ्यासक्रमासही प्रवेश घेतला होता. मात्र, वय आणि प्रकृतीच्या कारणाने त्यांना त्याकडे दुर्लक्ष करावे लागले. त्यानंतर आ. श्री. छ. शिवेंद्रसिंहराजे यांच्या विनंतीनुसार त्यांनी शेंद्रे गटातून जिल्हा परिषदेच्या मताधिक्क्याने निवडूण आले होते. छत्रपती शिवारायांच्या युध्द वर्णनाची व्याख्यानमालांसाठी त्यांना पानिपतसह परदेशातही दौरे केले होते. 

COMMENTS