रजनीकांत यांच्या राजकीय प्रवेशाला पूर्णविराम

Homeताज्या बातम्यादेश

रजनीकांत यांच्या राजकीय प्रवेशाला पूर्णविराम

चेन्नई : तामिळनाडूच्या राजकारणात प्रवेश करणार असल्याचे अनेक वर्षांपासून बोलले जात आहे. त्यासाठी रजनीकांत यांनी रजनी मक्कल मंद्रम संघटना स्थापन करत रा

प्रशासनातील महिलांचे स्थान धोक्यात
भेटवस्तू पाठविण्याचे आमिष दाखवून 35 हजारांची फसवणूक
जाामखेड शहर अस्वच्छतेच्या विळख्यात

चेन्नई : तामिळनाडूच्या राजकारणात प्रवेश करणार असल्याचे अनेक वर्षांपासून बोलले जात आहे. त्यासाठी रजनीकांत यांनी रजनी मक्कल मंद्रम संघटना स्थापन करत राजकीय प्रवेशाचे संकेत दिले होते. मात्र सोमवारी रजनीकांत यांनी या संपूर्ण चर्चांना पूर्णविराम देत, आपला राजकारणात येण्याचा कोणताही विचार नसल्याचे स्पष्ट केले आहे.
रजनी मक्कल मंद्रम या त्यांच्या संघटनेच्या सदस्यांसोबत चर्चा केल्यानंतर त्यांनी हा निर्णय जाहीर केला आहे. भविष्यातही आपला राजकारणात येण्याचा विचार नाही, असे रजनीकांत यांनी या बैठकीनंतर स्पष्ट केले आहे. तसेच आपली रजनी मक्कल मंद्रम ही संघटनाही बरखास्त करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे रजनीकांत यांची रजनी मक्कल मंद्रम ही संघटना रजनीकांत नरपनी मंद्रममध्ये किंवा रजनीकांत यांच्या चाहत्यांसाठीच्या संघटनेत विलीन होईल, असेही त्यांनी सांगितले आहे. या बैठकीच्या आधी रजनीकांत यांनी माध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले, आज होणार्‍या या बैठकीत माझ्या राजकारण प्रवेशाबद्दल तसंच संघटनेच्या प्रश्‍नांबद्दल चर्चा होईल. निवडणुका, कोरोना, चित्रीकरण आणि माझी तब्येत या सगळ्यामुळे मी सदस्यांना भेटू शकलो नव्हतो. पण आता मी त्यांची भेट घेईल आणि निर्णय घेईन. त्यानंतर अखेर रजनीकांत यांनी आपल्या राजकीय प्रवेशाला पूर्णविराम दिला आहे.

COMMENTS