येडीयुराप्पांना धक्का! मुलाला मंत्रिमंडळातून डावलले

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

येडीयुराप्पांना धक्का! मुलाला मंत्रिमंडळातून डावलले

बेंगळुरु : कर्नाटकाचे माजी मुख्यमंत्री येडियुरप्पा यांनी पायउतार होण्यापूर्वी भाजप पक्षश्रेष्ठीसमोर तीन अटी ठेवल्या होत्या. मात्र या तीनही अटी डावलल्

नामिबियातून आणलेल्या मादी चित्त्याचा मृत्यू
पुण्यात भाजपच्या नेत्याला खंडणीची धमकी
श्रीरामपूर-शेवगाव रोडवरील सर्व प्रकारची वाहतूक पर्यायी मार्गाने

बेंगळुरु : कर्नाटकाचे माजी मुख्यमंत्री येडियुरप्पा यांनी पायउतार होण्यापूर्वी भाजप पक्षश्रेष्ठीसमोर तीन अटी ठेवल्या होत्या. मात्र या तीनही अटी डावलल्यामुळे येडियुरप्पा आगामी काळात काय पवित्रा घेता, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देण्यापूर्वी येडियुरप्पा यांनी तीन अटी ठेवल्या होत्या. पहिली अट म्हणजेच आपल्या खासदार पुत्राला केंद्रात मंत्रीपदाची संधी द्यावी, तर दुसर्‍या आमदार पुत्राला राज्याच्या मंत्रिमंडळात संधी देण्यात यावी. आणि तिसरी अट म्हणजे, कर्नाटकाचा मुख्यमंत्री आपल्या मर्जीतील माणूस हवा. कर्नाटकाचे नवे मुख्यमंत्री बोम्मई लिंगायत समाजाचे असून, ते येडियुरप्पा यांच्या मर्जीतील असल्याचे बोलले जात आहे. बोम्मई यांना गेल्या आठवड्यात भाजपाने नवे मुख्यमंत्री म्हणून पुढे आणले होते. यानंतर त्यांनी 28 जुलैला मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली होती. बीएस येडीयुराप्पांना राजीनामा द्यावा लागला होता. येडीयुराप्पा यांनी मुख्यमंत्री पद सोडण्यासाठी दिल्लीतील नेत्यांसमोर काही अटी ठेवल्या होत्या. खासदार असलेला मोठा मुलगा बी.एस राघवेंद्रला केंद्रात मंत्रिपद, दुसरा मुलगा बी.एस. विजेंद्र याला राज्यात मंत्रिपद आणि मुख्यमंत्री मी सांगेन तोच, अशा या अटी होत्या. पैकी लिंगायत समाजाचा नेता निवडून भाजपश्रेष्ठींनी येडीयुराप्पांची एक अट मान्य केली आहे. बोम्मई हे येडीयुराप्पांचे खास आहेत. परंतू अन्य दोन अटी मान्य केलेल्या नाहीत. बोम्मई यांच्या मंत्रिमंडळाचा थोड्याच वेळात शपथविधी होणार आहे. यामध्ये येडीयुराप्पा यांचा मुलगा विजयेंद्र याला घेण्यात आलेले नाही. विजयेंद्र सरकारमध्ये आणि मंत्र्यांच्या खात्यांच्या कामात हस्तक्षेप करत असल्याचा आरोप मंत्री आमदारांनी केला होता. यामुळे त्याला मंत्रिमंडळात घेतल्यास हे नेते नाराज होण्याची शक्यता होती. यामुळे विजयेंद्रला बाजुला सारण्यात आले आहे. नव्या मंत्रिमंडळात जातीचे समीकरण पेलताना 8 लिंगायत, वक्कलीग आणि ओबीसी समाजाचे प्रत्येकी 7, 3 दलित एक एसटी आणि एका महिलेचा समावेश आहे. आज 29 मंत्री शपथ घेणार आहेत.

COMMENTS