सध्या फलटण शहरासह तालुक्यामध्ये कोरोनाचे रुग्ण हे मोठ्या संख्येने आढळून येत आहेत. कोरोनाची फलटण शहरातील परिस्थिती ही भयंकर व भीतीदायक आहे.
पुणे : सध्या फलटण शहरासह तालुक्यामध्ये कोरोनाचे रुग्ण हे मोठ्या संख्येने आढळून येत आहेत. कोरोनाची फलटण शहरातील परिस्थिती ही भयंकर व भीतीदायक आहे. फलटण शहर व परिसरात कोरोनाबाधित रुग्ण हे मोठ्या प्रमाणावर आढळून आलेले आहेत व येत आहेत. फलटण शहरासह तालुक्यात कोरोनामुळे अनेकांचे मृत्यू सुद्धा झालेले आहेत. ही सर्व परिस्थिती लक्षात घेता यंदा सुद्धा आषाढी वारीचा पालखी सोहळा हा पायी नसावा असा अभिप्राय फलटण नगरपरिषदेचे मुख्याधिकारी संजय गायकवाड यांनी संत ज्ञानेश्वर महाराज कमिटीला पत्राद्वारे पाठवलेली आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गतवर्षीपासून बंद असलेल्या आषाढी वारीला यंदा पोषक वातावरण आहे का ? गावात कोरोनाची परिस्थिती कशी आहे ? याबाबत श्री संत ज्ञानेश्वर महाराज संस्थानचे वतीने पालखी मार्गावरील गावांना पत्रव्यवहार करण्यात आलेला होता. त्यानुसार फलटण नगरपालिकेस १६ मे रोजी लिहलेले पत्र प्राप्त झालेले होते. त्या पत्रानुसार फलटण नगर पालिकेच्या वतीने मुख्याधिकारी संजय गायकवाड यांनी श्री संत ज्ञानेश्वर महाराज कमिटीला फलटण शहरासह परिसरातील कोरोनाची सद्यस्थिती निदर्शनास आणून दिलेली आहे.
COMMENTS