श्रीरामपूर - राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचे अहिंसा, शांती व बंधुत्व या तत्त्वाची देशाला आजच्या परिस्थितीत गरज आहे. महात्मा गांधी यांनी देशाला सत
श्रीरामपूर –
राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचे अहिंसा, शांती व बंधुत्व या तत्त्वाची देशाला आजच्या परिस्थितीत गरज आहे. महात्मा गांधी यांनी देशाला सत्याग्रह, चळवळ आणि जनआंदोलनाची मोठी देणगी दिलेली आहे. याप्रमाणेच दिवंगत पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांनी जय जवान जय किसान हा नारा देऊन जवान आणि शेतकरी यांचे महत्त्व अधोरेखित केले. या दोघांचेही जीवन देशासाठी समर्पित होते. त्यांचे स्मरण देशाच्या युवा पिढीसाठी प्रेरणादायी असल्याचे प्रतिपादन माजी आ.भानुदास मुरकुटे यांनी केले.
लोकसेवा विकास आघाडीच्या वतीने राष्ट्रपिता महात्मा गांधी तसेच माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांच्या जयंती निमित्त माजी आ.श्री.मुरकुटे यांच्या हस्ते महात्मा गांधी पुतळ्यास तसेच स्व.लालबहादूर शास्त्री यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले.
याप्रसंगी युवक नेते सिद्धार्थ मुरकुटे, अशोक बँकेचे व्हा.चेअरमन अॅड्.सुभाष चौधरी, माजी उपनगराध्यक्ष भाऊसाहेब मुळे, अशोक बँकेच्या संचालिका सौ.मंजुश्री मुरकुटे, नाना पाटील, व्यापारी असोसिएशनचे संचालक अमोल कोलते, शिवसंकल्प सोशल फौंडेशनचे अध्यक्ष रोहन डावखर, खादी ग्रामोद्योग संघाचे व्हा.चेअरमन प्रविण फरगडे, साजिद मिर्झा, सौ.शालिनी कोलते, संदीप डावखर, अमित गांधी, शरीफ मेमन, रियाज पठाण, वैभव सुरडकर, प्रमोद करंडे, संजय मोरगे, अनिल गिरमे, प्रदीप जाधव, जयेश परमार, दत्तात्रय सलालकर, बाळासाहेब मोरगे, प्रदीप आहिरे, सोहम मुळे, अजय जाधव, अक्षय माने, अनिल सोमाणी आदी उपस्थित होते.
अशोक कारखाना कार्यस्थळावर चेअरमन भाऊसाहेब कहांडळ यांचे हस्ते महात्मा गांधी व माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांच्या प्रतिमेचे पूजन करुन अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी व्हा.चेअरमन पोपटराव जाधव, कार्यकारी संचालक संतोष देवकर, कार्यालय अधिक्षक आप्पासाहेब दुशिंग, मुख्य शेतकी अधिकारी नारायण चौधरी, फायनान्स मॅनेजर निलेश गाडे, लेबर ऑफिसर अण्णासाहेब वाकडे, विजयकुमार धुमाळ, किशोर मुरकुटे, सुधीर भराडे, बाबासाहेब तांबे, विक्रांत भागवत, विलास लबडे बाळासाहेब मेकडे, बबन पटारे आदी उपस्थित होते.
अशोक शैक्षणिक संकुलाच्यावतीने पाॕलिटेक्निक महाविद्यालय, कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, भास्करराव गलांडे आय.टी.आय., अशोक आयडीअल व इंग्लिश मिडीम स्कूल येथेही म.गांधी व स्व.शास्ञी यांना वंदन करण्यात आले. यावेळी प्राचार्य अंजाबापू शिंदे, प्राचार्य डाॕ.गोरख बारहाते, उपप्राचार्य सौ.सुनिता गायकवाड, प्रा.सुयोग थोरात, प्राचार्य रईस शेख, प्राचार्य डाॕ.माधव पगारे उपस्थित होते.
COMMENTS