Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

‘म्हाडा’ विद्यार्थ्यांसाठी बांधणार वसतिगृह

गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी विद्यार्थ्यांसाठी एक महत्त्वाची घोषणा केली आहे.

अक्षय कुमारने रिलीज केले ओह माय गॉड 2 चे पोस्टर | Filmy Masala (Video)
राहाता शहरात मुस्लिम समाज आक्रमक
गोदापात्रात उडी मारून शिक्षकाची आत्महत्या

मुंबई/प्रतिनिधीः गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड  यांनी विद्यार्थ्यांसाठी एक महत्त्वाची घोषणा केली आहे. म्हाडा आता विद्यार्थ्यांसाठी वसतिगृह बांधणार असल्याची माहिती त्यांनी दिली.

कॅन्सरच्या उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांच्या नातेवाइकांची तात्पुरती राहण्याची व्यवस्था केल्यानंतर म्हाडा आता विद्यार्थ्यांसाठी वसतिगृह बांधणार आहे. मुंबई शहरामध्ये चार ठिकाणी अशी वसतिगृहे बांधण्यात येतील. त्याच्यातील पहिल्या वसतिगृहाची सुरुवात काळाचौकी, जिजामाता नगर येथे करण्यात येईल, अशी माहिती आव्हाड यांनी दिली आहे. आव्हाड यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत ट्वीट केले आहे.”सरकारच्या असे निदर्शनास आले आहे, की मुंबई, ठाण्यामधील म्हाडा कॉलनीमध्ये एक-एका इमारतीचा विकास करण्यासाठी म्हणून विकासकाने तिथल्या रहिवाशांबरोबर समझोता करार केला आहे; पण अनेक वर्षे या इमारतींचा विकास न-करता तसेच रहिवाशांना भाडे न-देता मुजोरपणाची वागणूक हे विकासक करीत आहेत. यापुढे पाच वर्षांपेक्षा अधिक काळ जर विकासकाने इमारतीचे काम रोखून ठेवले, तर म्हाडाला ती इमारत स्वत: डेव्हलप करेल आणि विकासकाचा करार रद्द समजण्यात येईल,” असे  आव्हाड यांनी म्हटले आहे. 

COMMENTS