मोरणा विभागाला जोडणार्‍या रस्त्यावरील नेरळे येथे साकवचे काम 35 दिवसात पूर्ण

Homeमहाराष्ट्रसातारा

मोरणा विभागाला जोडणार्‍या रस्त्यावरील नेरळे येथे साकवचे काम 35 दिवसात पूर्ण

मोरणा विभागाला जोडणारा मुख्य रस्ता नेरळे गौंड ते मोरगिरी या दरम्यान नेरळे येथे असलेल्या ओढ्यावरील छोट्या पुलाचा पावसाळ्यात वाहनधारक तसेच ग्रामस्थांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत होते.

पुण्यात वर्क फ्रॉम होमच्या बहाण्याने साडे पाच लाखाचा गंडा
आमदार गायकवाडवर अ‍ॅट्रोसिटीचा गुन्हा दाखल
चालकाचे नियंत्रण सुटल्याने रिक्षा गेली गटारात .

मोरगिरी / वार्ताहर : मोरणा विभागाला जोडणारा मुख्य रस्ता नेरळे गौंड ते मोरगिरी या दरम्यान नेरळे येथे असलेल्या ओढ्यावरील छोट्या पुलाचा पावसाळ्यात वाहनधारक तसेच ग्रामस्थांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत होते. गृहराज्य मंत्री शंभूराज देसाई यांच्या प्रयत्नामुळे नाबार्डमधून 50 लाख रुपये निधी मंजूर झाला होता. त्याचे भूमिपूजन होऊन लगेचच कामाला तात्काळ सुरुवात आणि ठेकेदार कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक ठेकेदार आनंदा मोहिते यांनी अवघ्या 35 दिवसात नेरळे येथील ओढ्यावरिल पुल पूर्ण केला असून सध्या वाहतुकीस सुरु झाला आहे.

या पुलामुळे मोरणा विभागातील जनतेतून समाधान व्यक्त केले जात आहे. ना. शंभूराज देसाई यांच्या प्रयत्नामुळे तालुक्यात कोट्यवधीची विकास कामे सुरु आहेत तर काही कामे पूर्ण झाली आहेत. मोरणा विभागात अनेक विकास कामे पूर्ण झाली आहेत. मोरणा विभागाला जोडणारा मुख्य रस्ता पावसाळ्यात दळणवळणासाठी फार मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत असे. पावसाळा काळात नेरळे येथील ओढ्यावर मोठ्या प्रमाणात पाणी साठत असे. याच कारणाने वाहतूक बंद होत होती. पण यंदा याच ओढ्यावर चांगल्या उंचीचा साकव पुला उभा राहिल्यामुळे या पावसाळ्यात वाहतुकीस किंवा ये-जा करण्यास अडचण येणार नाही. ना. शंभूराज देसाई यांच्या प्रयत्नामुळे नेरळे येथे झालेल्या पुलामुळे लोकांची गैरसोय दूर होणार असल्यामुळे लोकांनमधून समाधान व्यक्त होत असून ना. देसाई यांचे आभार मानले जात आहे.                                            

COMMENTS