अफगाणीस्तानमध्ये झालेल्या तालिबानी क्रांतीचा मुद्दा पुढे करून भारतातील अंधभक्त मोदी सरकारच्या धोरणांमध्ये असलेले सामर्थ्य विषद करू लागले आहेत.भारताती
अफगाणीस्तानमध्ये झालेल्या तालिबानी क्रांतीचा मुद्दा पुढे करून भारतातील अंधभक्त मोदी सरकारच्या धोरणांमध्ये असलेले सामर्थ्य विषद करू लागले आहेत.भारतातील इंधन दरवाढीसह अन्य काही जनहिताचे मुद्दे मोदींची प्रतिमा हनन करू लागल्याने महागाई पेक्षा राष्ट्राचे स्वातंत्र्य महत्वाचे असा तोकडा युक्तीवाद करून हनन होऊ पाहणाऱ्या प्रतिमेला डागडूजी करण्याचा खटाटोप भक्तमंडळी करू लागली आहेत.या मंडळींच्या डोळ्यावर बांधलेल्या अंधविश्वासाच्या पट्टीमुळे वास्तव त्यांच्या लक्षात येत नाही.केवळ एका विशिष्ट धर्माला लक्ष्य करून कथित हिंदूत्ववादी मोदी सरकारची वाहवा करतांना पुढे वाढून ठेवलेले आव्हानांचे ताट मात्र दिसत नाही. या आव्हानांसमोर मोदी सरकारचे पाय लटपटणार की स्थिर उभे राहणार हे पहाणे औत्सुक्याचे असणार आहे.
तिकडे अफगाणीस्तानमध्ये अवघ्या दहा पंधरा दिवसात तालिबानी शक्तींनी अमेरिकेच्या देखरेखीखाली सत्तेवर आलेल्या लोकशाहीवादी सरकारला पळवून लावल्यानंतर इकडे भारतात भक्तमंडळींना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या धोरणात्मक सामर्थ्याची नव्याने ओळख होऊ लागली आहे,स्वतःला झालेली ही ओळख जगाला सांगण्यासाठीही ही भक्तमंडळी प्रचंड आतूरलेली आणि आसूसलेली आहे.सध्या भारतात पेट्रोल डिझेलची प्रचंड दरवाढ झाल्याने एकूण महागाईचा निर्देशांकही सामान्यांच्या आवाक्याबाहेर वाढला आहे.परिणामी विद्यमान केंद्र सरकारविरूध्द देशभर जनमानसात असंतोषाची सुप्त लाट पसरली आहे.सरकारवर पर्यायाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर असलेली देशाची ही नाराजी सोयीस्करपणे दुर सारण्यासाठी अंधभक्तांची टोळी असलेल्या आयटी सेलने एक मोहीम राबविण्यास सुरूवात केली आहे.भारतात इंधन दरवाढ आणि त्यातून महागाई वाढत असली तरी पंतप्रधान मोदी आहेत म्हणून भारत सुरक्षीत असल्याचा कांगावा करण्यास या मंडळींनी सुरूवात केली आहे.
अफगाणिस्तानात पेट्रोल स्वस्त आहे.तथापी त्यांच्याकडे नरेंद्र मोदींसारखा पंतप्रधान नव्हता,म्हणून तालिबानी संघटनेने त्या देशावर पुन्हा एकदा कब्जा केला.मोदी आहेत,म्हणून भारत सुरक्षीत आहे,मोदी नसते तर भारताचाही अफगाणीस्तान झाला असता.भारताचा अफगाणीस्तान होऊ द्यायचा नसेल तर पुन्हा एकदा खरे तर तिसऱ्यांदा भारत मोदींच्या हाती सोपवा.अशी इच्छा व्यक्त करणारे संदेश समाज माध्यमांवर फिरवले जाऊन मिशन २०२४ ची जोरदार तयारी या मंडळींनी सुरू केल्याचे दिसते. गेल्या चारपाच दिवसांपासून अशा प्रकारचे असंख्य संदेश फिरत आहेत.खरे तर हे भक्त मुळातच अंध.नजरेचा दुरपर्यंत संंबंध नसल्याने दुरदृष्टी काय असते याचा मागमूसही नाही.परिणामांचा लवलेशही नाही.नजर नाही म्हटल्यावर आजूबाजूला घडत असलेल्या घटनांचा संदर्भ त्यांना लागत नाही.या घटनांच्या संवेदना मेंदूपर्यंत पोहचून बुध्दीचा विकास होण्याचाही प्रश्न नाही,नजर नाही बुध्दीशी दूरदूरवर संबंध नाही,याची अनूभूती पुन्हा एकदा या अशा प्रतिक्रीयांवरून आली.
सन २०१४ पासून अशा जातकूळळी प्रचंड प्रमाणावर फोफावल्या आहेत.या मंडळींच्या नजरेत भारताला स्वातंत्र्यच मुळी २०१४ साली मिळाले आहे.भारताचा अवघा विकास या सात वर्षातच झाला आहे.असा समज मंडळींनी करून घेतल्याने मागील ६८ वर्षात म्हणजे मोदी पहिल्यांदा पंतप्रधान होईपर्यंत काय काय घडले याची या पामराला कल्पना तरी कशी असणार.देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर तब्बल ६८ वर्ष या देशात लोकशाही प्रक्रीयेने निवडून आलेले स्वदेशी सरकार होते,त्या एकाही सरकारमध्ये मोदी पंतप्रधान नव्हते.किंबहूना स्वातंत्र्य मिळाले तेंव्हा आजचे विकासपुरूष मोदी – शहा यांचा जन्मही झाला नव्हता.तरीही एव्हढी वर्ष हा देश सुरक्षीत राहीला.त्याचा अफगाणीस्तानही झा ला नाही आणि पाकीस्तानही नाही.मोदी शहांच्या गैरहजेरीत या देशात पेट्रोल डिझेल स्वस्त होते,खाद्यतेलही सामान्य माणसाच्या आवाक्यात होते.या देशात मुस्लीमही होते आणि मदरसेही,तरीही हा देश तालिबान्यांच्या हातात जाऊन या देशाचा अफगाणीस्तान झाला नाही.देश काँग्रेसच्या हातात आला की असुरक्षीत होतो आणि भाजपाच्या हातात आला की सुरक्षीत रहातो,हा युक्तीवाद पाजळून अंधभक्त देशाची नव्हे तर स्वतःची घोर फसवणूक करीत आहेत.उलटपक्षी या देशाला संरक्षण कुणा नेत्याचे नाही तर संविधानाच्या कवच कुंडलांमुळे हा देश सुरक्षीत आहे,हे अंधभक्तांनी विसरता कामा नये.आपल्या संविधानाने स्वीकारलेल्या संसदीय लोकशाहीमुळे आपल्या देशात अनेक जातीधर्माचे, पंथाचे, वेगवेगळ्या विचारांचे, भिन्न भाषा बोलणारे, भिन्न प्रादेशिक भूभागात राहणारे असे सगळे लोक इथे त्यांच्या संस्कृतीसहित एकत्रित आणि सुरक्षित राहू शकतात हे केवळ आपण स्वीकारलेल्या संसदीय लोकशाहीमुळे व ही लोकशाही चालवणाऱ्या संविधानामुळेच. म्हणून संविधान सुरक्षित तर देश सुरक्षित.
देशापेक्षा धर्माला अधिक महत्व दिल्यास त्या देशाचा तालिबान होत असतो.हे वास्तव या अंधभक्तांनी नजरेआड करू नये. कोणत्याही धर्मापेक्षा देश आणि त्या देशाचे संविधान अधिक महत्वाचे आहे. देश म्हणजे केवळ एक जमिनीचा तुकडा नसून तिथे राहणारे सगळया जातीधर्माचे, पंथांचे, वेगवेगळया विचारांचे लोक आणि त्या वैविध्यतेला एकत्र बांधून ठेवणारी राष्ट्रीय अस्मिता चेतविणारी सार्वभौम भुमिका देशाला तालिबानी होण्यापासून वाचवणार आहे हे लक्षात घेऊनच भाकड कथांची पेरणी करावी.
COMMENTS