मोदींनी भाजपची कमान हाती घेतल्यापासून पक्षाने मागे वळून पाहिले नाही… अमित शहांची स्तुतीसुमने

Homeताज्या बातम्यादेश

मोदींनी भाजपची कमान हाती घेतल्यापासून पक्षाने मागे वळून पाहिले नाही… अमित शहांची स्तुतीसुमने

दिल्ली : प्रतिनिधी राजकारण नेते धोका पत्करणे टाळतात त्यामुळे अनिश्चितता निर्माण होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) देशहितासाठी राजकीय

ऑस्ट्रेलियाच्या सीमा जगासाठी खुल्या (Video)
दहशतवाद्यांनो…! हिंमत असेल तर समोर या (Video)
Yogi Adityanath : “पुराव्याशिवाय कोणालाही अटक होणार नाही” (Video)

दिल्ली : प्रतिनिधी

राजकारण नेते धोका पत्करणे टाळतात त्यामुळे अनिश्चितता निर्माण होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) देशहितासाठी राजकीय धोका पत्करून ठाम निर्णय घेतात, 

असे प्रतिपादन गृहमंत्री अमित शहा (Amit Shah) यांनी केले. मोदींना सत्तेत २० वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त संसद टीव्हीला दिलेल्या मुलाखतीत ते बोलत होते.

आम्ही सरकार चालवण्यासाठी नाही तर देशात चांगले बदल घडवण्यासाठी सत्तेत आलो आहोत, अशी मोदी यांची भूमिका आहे. 

जगात भारताचे स्थान सर्वात सन्मानजनक असावे, या दिशेने मोदी सरकारची वाटचाल सुरू आहे. मोदींना प्रशासनाचे बारकावे समजले आहेत, असे ते म्हणालेत.

मोदींच्या आयुष्याबद्दल शहा म्हणालेत की “त्यांचे सार्वजनिक जीवन तीन भागात विभागले जाऊ शकते. एक, भाजपामध्ये सामील झाल्यानंतर. 

त्यांचा हा पहिला काळ संघटनात्मक कामाचा होता. दुसरा काळ मुख्यमंत्री आणि तिसरा राष्ट्रीय राजकारणात आल्यानंतर पंतप्रधान झाल्यानंतरचा.

“मोदींना भाजपामध्ये पाठवण्यात आले. संघटन मंत्री बनवण्यात आले. त्यावेळी गुजरातमध्ये भाजपाची स्थिती वाईट होती आणि लोकसभेत भाजपाला देशात फक्त दोन जागा मिळाल्या होत्या. 

संघटना मंत्री म्हणून १९८७ पासून त्यांनी पक्षाची सूत्रे हाती घेतली. १९८७ नंतरची पहिली निवडणूक अहमदाबाद महानगरपालिकेची झाली. 

पहिल्यांदाच भाजपा स्वबळावर महापालिकेत सत्तेवर आली. त्यानंतर भाजपाचा सत्तेकडे प्रवास सुरू झाला. १९९० मध्ये आघाडी करून सत्तेत आलो. 

त्यानंतर, १९९५ मध्ये पूर्ण बहुमताने सत्तेत आलो आणि नंतर आजपर्यंत भाजपाने मागे वळून पाहिले नाही” असे अमित शहा म्हणालेत.

COMMENTS