मोदींना हिरोची उपमा… ‘या’ क्रिकेटरने केले कौतुक…

Homeताज्या बातम्यादेश

मोदींना हिरोची उपमा… ‘या’ क्रिकेटरने केले कौतुक…

प्रतिनिधी : दिल्ली काही दिवसांपूर्वी आसाम सरकारने बेकायदेशीरपणे होणारी गेंड्यांची शिकार रोखण्यासाठी मोठे पाऊल उचलले . जागतिक गेंडा दिनी (World

मोदींचे राजकारण सूडाचे नव्हे लोकशाहीच्या सक्षमीकरणाचेच !
मंत्री नव्हे, पंतप्रधानच बदलण्याची गरज नाना पटोले l DAINIK LOKMNTHAN
इस्रोच्या मुख्यालयातून पंतप्रधानांच्या 3 मोठ्या घोषणा

प्रतिनिधी : दिल्ली

काही दिवसांपूर्वी आसाम सरकारने बेकायदेशीरपणे होणारी गेंड्यांची शिकार रोखण्यासाठी मोठे पाऊल उचलले . जागतिक गेंडा दिनी (World Rhino Day) २४७९ गेंड्याच्या शिंगांची होळी करत शिकाऱ्यांना गंभीर इशारा दिला होता . 

यासंदर्भांत मुख्यमंत्री हेमंत बिस्वा शर्मा यांनी ट्वीट करत माहिती दिली . आसाम सरकारच्या या निर्णयाचे पंतप्रधान मोदींनी कौतुक केले . 

एक शिंगाचा गेंडा भारताचा गौरव आहे आणि त्याच्या भल्यासाठी योग्य ती पावले उचलली जातील, असे म्हणत मोदींनी आसाम सरकारच्या या निर्णयाचे स्वागत केले . यावरून क्रिकेटर केविन पीटरसनने पंतप्रधान नरेंद्र मोदींचे कौतुक केले .

पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी गेंड्यांच्या प्रजातींच्या संवर्धनासाठी महत्वाची भूमिका घेतली . मोदींच्या या निर्णयाबद्दल इंग्लंडचा माजी क्रिकेटर केविन पीटरसनने मोदींचे ट्विटरच्या माध्यमातून तोंडभरून कौतुक केले आहे.

पीटरसनने मोदींचे कौतुक करत ट्विटमध्ये म्हटले की, धन्यवाद, नरेंद्र मोदीजी. एक जागतिक स्तरावरील नेता गेंड्यांच्या प्रजाती वाचविण्यासाठी पुढाकार घेत आहे . इतर नेतेमंडळींनीही अशीच भूमिका घेणे गरजेचे आहे. यामुळेच भारतात गेंड्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. व्हॉट अ हिरो”,असे पीटरसनने ट्विटमध्ये म्हंटले आहे

COMMENTS